मुंबई : राज्य सरकारच्या आदेशाने (observed by order of state government) पुरुष नसबंदी पंधरवडा (Male sterilization fortnight) साजरा केला जात आहे. मात्र मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरातील पुरुषांची मानसिकताही एखाद्या खेड्यातील पुरुषासारखी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या पाच वर्षात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकडे महिला आघाडीवर असून पुरुषांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मुलांना जन्म देणे आणि कुटूंब कल्याणाचे काम स्त्रियांनी (Womens responsibility for family welfare) करावे, असा एक ग्रह तयार झाला आहे. याला छेद देण्याची गरज (Need to break this mindset) असल्याचे मत मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलतांना व्यक्त केले आहे.
महिलांवर सर्व जबाबदारी :देशातील लोकसंख्या वाढीवर उपाय म्हणून २ मुलांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात. भारतीय शिक्षित झाले मात्र त्यानंतरही आजही नियोनाची जबाबदारी बऱ्याचदा स्त्रीयांनाच पार पाडावी लागते. कुटुंब नियोजनात पुरुषाच्या सहभागाला चालना देण्यासाठी २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडा साजरा केला जात आहे. या प्रसंगी डॉ. गोमारे बोलत होत्या. यावेळी बोलताना नसबंदी, कुटुंब कल्याण याबाबत पुरुषांकडून गांभीर्याने बघितले जात नाही. महिलांवर सर्व जबाबदारी टाकली जाते. मुलांना जन्म देणे हे काम स्त्रियांचे आहे. तसेच कुटूंब कल्याणाचे कामही स्त्रियांनी करावे, असा एक ग्रह तयार झाला आहे. याला छेद देण्याची गरज आहे. महिलांप्रमाणे पुरुषांनीही नसबंदीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. नसबंदी एकदम सोपी शस्त्रक्रिया आहे. त्यासाठी ऍडमिट होण्याची गरज नाही. ओपीडी मध्ये प्राथमिक तपासणी करून दोन तासात घरी पाठवेल जाते. स्त्रियांची नसबंदी करताना त्यांना ऍडमिट व्हावे लागते. अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात असे डॉ. गोमारे म्हणाल्या.