महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत मलेरियाचा संसर्ग तर लेप्टोने एकाचा मृत्यू, कोरोनासह साथीच्या आजारांचे सावट

मुंबईत सप्टेंबर महिन्यात मलेरीयाचे 661, लेप्टोचे 54, डेंग्यूचे 14, गॅस्ट्रोचे 91, हेपेटायसीसचे 15 तर एच 1 एन 1 चा 1 रुग्ण आढळून आला आहे.

By

Published : Oct 1, 2020, 11:21 AM IST

Published : Oct 1, 2020, 11:21 AM IST

मुंबईत मलेरियाचा संसर्ग तर लेप्टोने एकाचा मृत्यू
मुंबईत मलेरियाचा संसर्ग तर लेप्टोने एकाचा मृत्यू

मुंबई - शहरात पावसाळ्यात दरवर्षी साथीचे आजार डोके वर काढतात. पालिकेच्या आरोग्य विभागाने साथीच्या आजाराने बाधित रुग्ण आणि मृत्यू झालेल्यांची आकडेवारीचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण आढळून आले असून लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत सप्टेंबर महिन्यात मलेरीयाचे 661, लेप्टोचे 54, डेंग्यूचे 14, गॅस्ट्रोचे 91, हेपेटायसीसचे 15 तर एच 1 एन 1 चा 1 रुग्ण आढळून आला आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मलेरीयाचे 732, लेप्टोचे 56, डेंग्यूचे 233, गॅस्ट्रोचे 425, हेपेटायसीसचे 105 तर एच 1 एन 1 चे 9 रुग्ण आढळून आले होते. तर लेप्टोने 3 जणांचा मृत्यू झाला होता. मागील वर्षांपेक्षा यावर्षी लेप्टोने मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या घटली असली तरी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडून लेप्टोस्पायरेसिस बाबत झोपडपट्टी व इतर ठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात आले. प्रौढांना डॉक्सीसाइक्लिन आणि प्रोफिलेक्सिझोफ गोळ्या देण्यात आल्या आहेत तर लहान मुलांना व गर्भवती महिलांना अ‍ॅझिथ्रोमाइसिनच्या गोळ्या देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. सोबतच पोस्टर, वृत्तपत्र जाहिराती, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details