मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने रविवारी पहाटे त्याची प्रेमिका मलायका अरोरा हिला वाढदिवसाच्या (Malaika Arora turns 49) हार्दिक शुभेच्छा दिल्या. इंस्टाग्रामवर अर्जुनने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्याने कॅप्शन दिले आहे की, 'यिन टू माय यंग हॅपी बर्थडे बेबी जस्ट बी यू, बी हॅप्पी, बी माय...' फोटोमध्ये अर्जुन मलायकाच्या मागे (Arjun Kapoor shares mushy birthday post for ladylove) उभा असलेला दिसतो. Malaika Arora Birthday
आरशासमोर हॉट पोझ देत शेयर केलेल्या फोटोला बॉलीवूड अभिनेत्री मलायकाने 'ओनली यू' असे कॅप्शन देत, रेड हार्ट इमोजी टाकले आहे. 2 स्टेट्सच्या अभिनेत्याने देखील एक पोस्ट शेअर केली. त्यावर लगेचच चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजीसह कमेंट टाकले. तर एका चाहत्याने त्यावर 'व्वा सोओओओओओ सुंदर आहे' अशी टिप्पणी केली. तर 'हॅपी बर्थडे मल्ला' अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक अभिषेक कपूरने दिली.
मलायका आणि अर्जुन गेल्या काही काळापासून डेट करत आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी दोघांनीही त्यांचे नाते सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला घेतला. या दोघांच्याही वयात 12 वर्षांचे अंतर असल्यामुळे ते सोशल मीडियावर सदैव ट्रोल होत असतात. त्यानंतरही मलायका आणि अर्जुन या दोघांनी देखील सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्यात कधीच कमी पडू दिली नाही.