महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालाड : भिंत कोसळल्याच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २४ वर

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी मध्यरात्री मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची सुरक्षा भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू तर ११९ जण जखमी आहेत. या जखमींना पालिकेच्या ट्रॉमा केअर, कूपर, शताब्दी, एमव्ही देसाई तसेच केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मालाड भिंत कोसळल्याच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा २३ वर

By

Published : Jul 3, 2019, 8:55 AM IST

Updated : Jul 3, 2019, 1:00 PM IST

मुंबई - येथील मालाड पिंपरीपाडा येथे सुरक्षा भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून मृतांची संख्या २४ वर पोहोचली आहे. शोध कार्यादरम्यान ढिगाऱ्याखालून आणखी दोघाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यापैकी एकाचे पप्पू गणेश शाह (३८) असे नाव आहे. ढिगाऱ्याखालून शाह यांना बाहेर काढून तत्काळ ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.


मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी मध्यरात्री मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची सुरक्षा भिंत कोसळून आता पर्यंत २४ जणांचा मृत्यू तर ११९ जण जखमी आहेत. या जखमींना पालिकेच्या ट्रॉमा केअर, कूपर, शताब्दी, एमव्ही देसाई तसेच केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मालाड पिंपरी पाडा दुर्घटनेत आतापर्यंत मृतांचा आकडा आकडा 24 वर पोहोचला आहे. या घटनेत एकूण 119 जखमी झाले होते. त्यापैकी 24 जणांवर तत्काळ उपाचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. तर 72 जण सध्या विविध रुग्णालयात उपाचार घेत आहेत. तर 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


यापैकी उपचार आणि मृतांची आकडेवारी दर्शविणारी माहिती पुढिल प्रमाणे

  • ट्रॉमा केअर रुग्णालयात ११ मृतदेह आहेत. तर ११ जखमीवर उपचार सुरू असून २१ जणांना सोडण्यात आले आहे.
  • कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात ११ मृतदेह आहेत. ५३ जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत २ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
  • तसेच मालाडच्या एम. व्ही. देसाई रुग्णालयात २ मृत आहेत.
  • अंधेरीच्या कूपर रुग्णालयात ६ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर आहे.
  • केईएम रुग्णालयात २ जखमींवर उपचार सुरू आहेत

या दुर्घटनेला भिंत बांधणारा विकासक दोषी असल्याची तक्रार मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान मुंबईत अध्यापही पावसाची संततधार सुरूच असून येत्या ४८ तासात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे

Last Updated : Jul 3, 2019, 1:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details