महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Malad Fire Disaster Victims:​ मालाडमधील अग्निकांड दुर्घटनेतील पीडितांनी ​शासनाची म​​दत नाकार​ली​; भाजपला चपराक ​ - भाजपची मालाड अग्निपीडितांना मदत

मालाड येथील आग दुर्घटनेत 67 जण बाधित झाले. राज्य शासनाच्या वतीने उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात विशेष बाब म्हणून बाधितांना 35 हजार चेक देण्याचा निर्णय घेतला. ​मात्र, ​ही रक्कम तुटपुंजी असल्याचे सांगत, बाधितांनी मदत​ नाकारली. ​राज्य शासनाचा कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न​ करणाऱ्या भाजप यावेळी चांगलीच तोंडघशी ​पडली​​​.

Malad Fire Disaster Victims
मालाडमधील अग्निकांड दुर्घटना

By

Published : Feb 16, 2023, 8:28 PM IST

अग्निकांड पीडितांनी नाकारलेल्या मदतीविषयी बोलताना मंत्री लोढा

मुंबई:​मालाड पूर्वेकडील वनजमिनीवरील जाम ॠषीनगर झोपडपट्टीत​​ सोमवारी​ भीषण आग लागली. लाकडी साहित्य, प्लास्टीक आदी ज्वलनशील पदार्थामुळे आगीचा भडका उडाला. ​अचानक लागलेल्या आगीमुळे एकच हाहाकार उडाला. भीतीने पळापळ झाली. या आगीची माहिती अग्निशमन कळताच, घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आगीने संपूर्ण परिसर वेढला. ​सुमारे शंभर​हून अधिक ​झोपड्या ​भक्ष्यस्थानी पडल्या. आगीत १० ते १५ गॅस सिलिंडरचा पाठोपाठ स्फोट​ झाले. या दुर्घटनेत १२​ ​वर्षीय मुलाचा​ दुदैवी​ मृत्यू झाला ​तर तीन जण जखमी झाले​. जखमींवर पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मदत जाहीर करा:मालाड येथील या झोपड्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आवारात येतात. वि​शेष बाब म्हणून ​बाधितांना मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली. आमदार सुनील प्रभू यांनी​ देखील, ​आगीत शेकडो कुटुंबे बेघर झाली असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करावी​. ​तसेच बाधित कुटुंबांचे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी स्थलांतर करावे, अशी मागणी​​ मुख्यमंत्री​ एकनाथ शिंदे​, पालकमंत्री​ मंगलप्रभात लोढा आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली होती.


भाजपकडून मदतीचा चेक ​नाकारला:​आगीत नुकसान झालेल्या झोपडी धारकांना राज्य शासनाच्या वतीने मदत देण्याचा निर्णय मंत्री लोढा यांनी घेतला. मंत्रालयात आज प्रातिनिधीक स्वरुपात मदतीचा चेक बाधितांना देण्याचा कार्यक्रम आखला. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते मंत्री लोढा यांच्या मंत्रालयातील दालनात चेक वाटपाचा कार्यक्रम घेतला. मात्र, केवळ 35 हजार रक्कम ही तुटपूंजी असल्याचे सांगत बाधितांनी ही रक्कम घेण्यास थेट नकार दिला. ​


भाजप तोंडघशी:झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. राज्य शासनाची मदत पुरेशी नाही. केवळ 35 हजारात घरे उभारणे शक्य नाही, असे सांगत बाधितांनी मदत नाकारली. भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी सध्या 35 हजार देत आहोत. लवकरच भरीव मदत केली जाईल, असे आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाधित आपल्या मतांवर ठाम राहिले. त्यांनी भर पत्रकार परिषदेत मदत नाकारत भाजपला तोंडघशी पाडले. प्रवीण दरेकर यांचा चेहरा यामुळे पार उतरला होता. अखेर बळजबरीने एका बाधिताच्या हातात मदतीचा चेक दिला.

100 हून अधिक झोपड्या जळून खाक: पश्चिम उपनगर मालाडच्या पूर्वेकडील जामर्षी नगर येथील वनजमिनीवरील झोपडपट्टीला 13 फेब्रुवारी, 2023 रोजी लागलेल्या आगीत एका 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. तर 15 सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या आगीत 10 ते 15 झोपडपट्टीवासी जखमी झाले होते. 100 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले.

15 सिलिंडरचा स्फोट:जळत्या झोपडीत ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट होताच आगीने रौद्ररूप धारण केले. सिलिंडरचा स्फोट झाल्याने कागदाचा तुकडा घशात अडकल्याने 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. येथील वनजमिनीवर प्लॅस्टिक आणि लोखंडी पत्र्याने बनविलेल्या झोपड्या आहेत. तर सिलिंडरचा स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी तर जीव वाचवण्यासाठी घरातून पळ काढला. त्यामुळे एकापाठोपाठ एक 15 सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी देण्यात आली.

हेही वाचा :Modi Pressures on Sri Lankan President : अदानीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी श्रीलंकेच्या अध्यक्षांवर मोदींचा दबाव; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details