मुंबई - अनेक गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपयोगी ठरत आहे. पण त्याचवेळी प्लाझ्मा दाते कमी असल्याने प्लाझ्मा थेरपीचा वापर कमी केला जात आहे. त्यात प्लाझ्मा दान करण्याऐवजी अनेकजण प्लाझ्माची विक्री अव्वाच्या सव्वा भावात करत असल्याच्याही तक्रारी आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता राज्य सरकारने बरे झालेल्या रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करणे बंधनकारक करावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रने केली आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान बंधनकारक करा - आयएमए - प्लाझ्मा दानाविषयी डॉ. अविनाश भोंडवे
प्लाझ्मा दान करण्याबाबत बरे झालेले रुग्ण उदासीन आहेत. पण जर रुग्णांना प्लाझ्मा दान करणे बंधनकारक केले, तर प्लाझ्माची उपलब्धी वाढेल, असे म्हणत डॉ. भोंडवे यांनी ही मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
![कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान बंधनकारक करा - आयएमए plasma donation mandatory plasma donation news dr avinash bhondave on plasma donation corona update news प्लाझ्मा दान न्यूज प्लाझ्मा दानाविषयी डॉ. अविनाश भोंडवे कोरोना अपडेट न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8019586-263-8019586-1594714299276.jpg)
महाराष्ट्रात 1 लाख 40 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर मुंबईतही 65 हजारापेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. पण, राज्य असो वा मुंबई एक टक्के रुग्णांनीही प्लाझ्मा दान केलेला नाही. त्यात अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी उपयोगी ठरते. पण, दाते नसल्याने तसेच रुग्णालय प्लाझ्मा थेरपीवर भर देत नसल्याने अनेक रुग्ण धोक्यात येत आहेत. तेव्हा प्लाझ्मा थेरपी वाढवणे गरजेचे असल्याचे मत आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
प्लाझ्मा दान करण्याबाबत बरे झालेले रुग्ण उदासीन आहेत. पण जर रुग्णांना प्लाझ्मा दान करणे बंधनकारक केले, तर प्लाझ्माची उपलब्धी वाढेल, असे म्हणत डॉ. भोंडवे यांनी ही मागणी राज्य सरकारकडे केली आहे. बरे झाल्यानंतर 15 ते 30 दिवसाच्या कालावधीत त्यांना बोलावून प्लाझ्मा घेता येईल, अशी व्यवस्था करावी तसेच त्यांच्यातील प्लाझ्मा दानाविषयीची भीती काढून टाकण्यासाठीही विशेष प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले आहे.