मुंबई - मुंबईमधील प्रदूषणाचा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी मुंबईकरांनी निसर्गाशी दोस्ती करावी, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. निसर्गाशी मी दोस्ती केली आहे, त्याचा फायदा मला झाला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण स्वतः मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून पुढाकार घेतल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या भायखळा राणीबागेत झाडे आणि फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात महापौर बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या, निसर्गाबरोबर राहायला पाहिजे, असे आपण नेहमी बोलतो. मात्र, आपण असे करत नाही. यामुळे मी स्वतःपासून निसर्गाशी मैत्री करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका मुख्यालयातील महापौर कार्यालयात आतापर्यंत खिडक्या बंद असायच्या. यामुळे मोकळी हवा येत नव्हती. मी महापौर झाल्यावर ताजी हवा कार्यालयात यावी म्हणून खिडक्या उघड्या ठेवल्या आणि माझी बसण्याची जागाही बदलली. मात्र, यामुळे माझ्यावर वास्तूशास्त्राप्रमाणे कार्यालयात बदल केल्याचा आरोप करण्यात आला. आता माझ्या कार्यालयात चांगली नैसर्गिक खेळती हवा असल्याने माझा दम्याचा त्रास कमी झाल्याचे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा -शेतकऱ्यांच्या हातावर तुरी.. हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी
किचन, टेरेसवर उद्यान उभारा -