महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपरमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ मकर संक्रातीनिमित्त हळदी-कुंकू - makarsankrant with sex workers

घाटकोपरमध्ये मकर संक्रांत निमित्त देहविक्री करणाऱ्या महिलांना हळदी कुंकू आणि वाण देऊन सण साजरा करण्यात आला. या अनोख्या सन्मानाने या महिला हरखून गेल्या होत्या.

घाटकोपरमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ मकरसंक्राती निमित्ताने हळदी कुंकू
घाटकोपरमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ मकरसंक्राती निमित्ताने हळदी कुंकू

By

Published : Jan 15, 2020, 9:50 PM IST

मुंबई - घाटकोपरमध्ये मकर संक्रांत सणानिमित्त आगळावेगळा हळदीकुंकू समारंभ पार पडला. विजयक्रीडा मंडळ आणि देवामृत फाउंडेशनच्या वतीने घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या वस्तीत देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत या संस्थांच्या महिलांनी हळदी कुंकू समारंभ केला. यावेळी महिलांना हळदी कुंकू आणि वाण देऊन आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी संकल्पबद्ध करण्यात आले.

घाटकोपरमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ मकरसंक्राती निमित्ताने हळदी कुंकू

मकर संक्रातीनिमित्त ठिकठिकाणी महिला हळदीकुंकू समारंभ करीत असतात. घाटकोपरमध्ये मकरसंक्रांत निमित्त देहविक्री करणाऱ्या महिलांना हळदी कुंकू आणि वाण देऊन सण साजरा करण्यात आला. या अनोख्या सन्मानाने या महिला हरखून गेल्या होत्या.

हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : वाधवा पिता-पुत्रांना नजरकैदेत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

देहविक्री करणाऱ्या महिलांनाही समाजात मानाचे स्थान मिळावे आणि त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा. अशा समाजप्रबोधनाच्या उपक्रमातून या महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. जेणेकरून देहविक्रीच्या शापातून या महिला मुक्त होतील म्हणून 'सन्मान तुझ्या स्त्रीत्वाचा' हा सामाजिक हळदीकुंकू उपक्रम राबविला गेला.

हेही वाचा -नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत

ABOUT THE AUTHOR

...view details