महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खिचडीपासून ते तिळाच्या लाडूपर्यंत, संक्रांतीला देशभरात बनवले जातात 'हे' खास पारंपरिक पदार्थ - मकर संक्रांती 2024

Makar Sankranti 2024 : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 15 जानेवारीला 'मकर संक्रांत' हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे, तेवढेच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते. तर दिवस लहान असतो. मात्र, या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. दरम्यान, मकर संक्रांतीनिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात, ते कोणते? यासंदर्भात आपण जाणून घेऊया.

makar sankranti 2024 khichdi to sesame seeds ladoo these dishes are made in country
खिचडीपासून ते तिळाच्या लाडूपर्यंत, संक्रांतीला देशभरात बनवले जातात 'हे' खास पारंपारिक पदार्थ

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 9:35 AM IST

Updated : Jan 15, 2024, 8:12 AM IST

मुंबई Makar Sankranti 2024 : वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय. हा सण देशाच्या विविध भागांमध्ये पोंगल, बिहू आणि माघी यासारख्या विविध नावांनी ओळखला जातो. या सणाला मोठं महत्त्व असून भारतात हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान, आज आपण मकर संक्रांतीनिमित्त घराघरात बनवल्या जाणाऱ्या खास पारंपरिक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत.

  • तिळाचे लाडू :मकर संक्रांतीला तिळाचे लाडू बनवण्याची परंपरा आजही कायम आहे. असं मानलं जातं की, तिळाच्या लाडूचे महत्त्व म्हणजे तिळात जास्त प्रमाणात सत्त्वगुणांचे शोषण आणि उत्सर्जन करण्याची क्षमता असते. तिळाच्या लाडूचे सेवन केल्यानं आंतरिक शुद्धीकरण होते. हे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम तीळ भाजून घ्या. त्यानंतर त्यात गूळ एकत्र करा आणि त्याचे लाडू बनवा.
  • खिचडी :मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक ठिकाणीपारंपारिकद्धतीने तांदूळ, मूग किंवा उडीद डाळ आणि विविध प्रकारचे मसाले वापरून खिचडी तयार केली जाते. काही लोक पौष्टिकता वाढवण्यासाठी यात भाज्याही घालतात. अनेकजण मकर संक्रांतीला खिचडी खाणं पसंत करतात.
  • पतिशप्ता : मकर संक्रांतीसाठी प्रत्येक बंगाली कुटुंबामध्ये पातिशप्ता हा पारंपरिक पदार्थ तयार केला जातो. मैदा, गहू किंवा तांदळाचं पीठ, गुळ, नारळ, दूध यासह अन्य काही पदार्थांचा वापर करून पातिशप्ता हा गोड पदार्थ तयार केला जातो.
  • पोंगल :दक्षिण भारतात पोंगल या सणाला विशेष महत्त्व आहे. या वर्षी हा सण 14 जानेवारीपासून सुरू झाला आहे. 4 दिवस चालणारा हा सण 17 जानेवारीला संपेल. या दिवशी दक्षिण भारतातील पारंपरिक रेसिपी 'गोड पोंगल' बनवण्यात येते. तांदूळ, मसूर आणि गूळ घालून बनवलेला आणि वेलचीची चव असलेला हा पदार्थ गोडपणा आणि उबदारपणाचा समतोल आहे. तसंच यात घालण्यात आलेल्या काजू आणि मनुका एक समाधानकारक कुरकुरीत आणि चव देतात. सुखदायक आणि आत्म्याला समाधान देणाऱ्या अनुभवासाठी हा गरमागरम पदार्थ सर्व्ह करा.
  1. चिक्की :मकर संक्रांतीच्या दिवशी शेंगदाणे, गूळ आणि तूप यांपासून शेंगदाण्याची चिक्की तयार केली जाते. शेंगदाण्याच्या चिक्कीमध्ये प्रोटीन्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असल्यानं ती शरीरासाठी उपयुक्त असतं.
Last Updated : Jan 15, 2024, 8:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details