मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष ( anti narcotics squad ) घाटकोपर युनिटने मोठी कारवाई केली आहे. काल मध्यरात्री दोन वाजून 45 मिनिटांच्या सुमारास सायन पनवेल महामार्गावर सायनकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाशी जकात नाका ते मानखूर्द जंक्शन यांच्या दरम्यान हायवेच्या बाजूला असणारे इलेक्ट्रिक पोल येथे सापळा रचून एकास 95 ग्राम वजनाच्या कोकेन या ड्रग्ससह आरोपीला पथकाने अटक ( Drug trafficker arrested ) केली आहे.
Drugs seized : अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई ; 29 लाखांचा कोकेन ड्रग्स केला जप्त - मुंबई ड्रग्ज जप्त कारवाई
मुंबई पोलिसांनी मानखुर्द परिसरातून एका अंमली पदार्थ तस्कराला अटक ( Drug trafficker arrested ) केली असून त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 28 लाख 50 हजार रुपये किंमत असलेले कोकेन जप्त ( seized 29 lakhs worth of cocaine drugs ) करण्यात आले आहे. NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे: मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्ष ( anti narcotics squad ) घाटकोपर युनिटने हा कोकेन ड्रग्स जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या कोकेनचा किंमत 28 लाख ५० हजार रुपये एवढी आहे.
28 लाखांचा कोकेन जप्त :एनडीपीएस कायदा 1985 कलम 21 ब आणि 8 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 21 डिसेंबरला अंमली पदार्थ विरोधी कक्ष घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या सूचनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक लोंढे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पालवे आणि त्यांच्या पथकाने मानखुर्द येथे सापळा रचून टी जंक्शन दरम्यान हायवेच्या बाजूस एकास संशयास्पद हालचालीनंतर त्याची चौकशी करून अंगझडती घेण्यात आली. पोलीस पथक पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यास घेराव घालून शितापीने पकडले या इसमाची दोन पंचांसमक्ष तपासणी केली असता त्याच्या अंगझडतीमध्ये 28 लाख 50 हजार किमतीचा 95 ग्राम कोकेन हा अमली पदार्थ ( seized 29 lakhs worth of cocaine drugs ) आढळून आला.
तपासातून माहिती उघड : या इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो इमामवाडा येथे राहणारा आहे. या आरोपी विरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे तर जे जे मार्क पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळत आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या आरोपीकडे केलेल्या तपासात तो गेल्या तीन वर्षांपासून कोकण या अमली पदार्थाची मुंबई शहरात तस्करी आणि विक्री करत असल्याचे समोर आले आहे. कोकेन हा अमली पदार्थ तो नवी मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या काही आफ्रिकन वंशाच्या इसमाकडून खरेदी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.