महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत चार मजली इमारतीला भीषण आग; दोन नागरिकांचा मृत्यू, तिघांची सुटका - आगीत दोन नागरिकांचा मृत्यू

Mumbai Fire News : मुंबईतल्या गिरगाव येथील गोमंती भवन इमारतीला (Gomti Bhawan Building) आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या माळ्याला आग लागल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन नागरिकांचे मृतदेह बाहेर काढले आहे. तर तीन नागरिकांना बचावण्यात यश आलं आहे.

fire News
चार मजली इमारतीला भीषण आग

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 10:44 PM IST

Updated : Dec 3, 2023, 2:20 PM IST

मुंबईMumbai Fire News: गिरगाव चौपाटी इथ इमारतीला लागलेल्या आगीत दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून तीन नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरातील एका चार मजली इमारतीला शनिवारी रात्री भीषण आग आगली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावलेल्या नागरिकांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इमारतीला भीषण आग: दक्षिण मुंबईतील गिरगाव भागातील एका इमारतीला शनिवारी रात्री भीषण आग लागली, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गिरगाव चौपाटी परिसरात असलेल्या गोमती भवन इमारतीला शनिवारी रात्री ९.५५ च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. ग्राउंड-प्लस-थ्री मजली इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आगीचे कारण अद्याप समजू शकलं नाही: या माहितीनंतर मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचं काम सुरू केलं आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "ही आग लेव्हल 2 ची आग असून ती भीषण आग असल्याचं संबोधण्यात आलं आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या, रुग्णवाहिका आणि मोठ्या संख्येनं अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नसून, तपास सुरू आहे" असं या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.

मुंबईतील आग्रीपाडा इमारतीला भीषण आग : या आधीही अशीच एक घटना घडली होती. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मुंबईतील आग्रीपाडा भागातील चिस्तिया पॅलेस या बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. ही आग इमारतीच्या तीन मजल्यांना लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसंच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नव्हती.

हेही वाचा -

  1. मुंबईत बहुमजली इमारतीला भीषण आग; सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
  2. Train Fire : धावत्या हमसफर एक्सप्रेसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारून जीव वाचवला, २ गंभीर
  3. Bhiwandi Fire : भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग; परिसरात धुराचे लोट
Last Updated : Dec 3, 2023, 2:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details