मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने केलेल्या कारवाईदरम्यान 30 लाख रुपयांचे चरस हस्तगत करण्यात आलेले आहे. या प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. फिरोज खान (48) व मोहम्मद आरिफ खान (46) अशी अटकेत आरोपींची नावेआहेत.
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 30 लाखांचा चरस जप्त, दोघांना अटक - मुंबई पोलीस न्यूज
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटने 30 लाख रुपयांचे चरस हस्तगत केले. याप्रकरणी दोघांना अटकही केली.
अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा वर्सोवा परिसरातील सात बंगला येथील नाना नाणी पार्कजवळ दोन संशयित व्यक्ती फिरत असल्याचे अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून दीड किलो चरस जप्त करण्यात आले. फिरोज खान या आरोपीच्या ताब्यातून 700 ग्रॅम चरस, तर मोहम्मद आरिफ खान याच्या ताब्यातून तब्बल 800 ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले.