मुंबई :20 एप्रिलला जेष्ठ महिला नागरीक (वय ६९ वर्ष) ऑर्लेम, मालाड पश्चिम या त्यांच्या राहत्या घरी बाथरूममध्ये पडून मयत झाल्याबाबत माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने घटनास्थळी भेट दिली. तेव्हा त्या बेशुध्द अवस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यांना तात्काळ शताब्दी हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले. त्याबाबत मालाड पोलीस ठाण्यात अपमृत्यु कलम १७४ सीआरपीसी अन्वये दाखल करण्यात आला होता.
महिलेचा मृत्यू संशयास्पद :तांत्रिक चौकशीत मयत महिलेच्या घरात काम करणारी अपंग महिला व एक मुलगा घरातुन बाहेर पडताना आणि त्याचवेळी कोवीड मास्क व टोपी घातलेला एक वयस्कर इसम घरामध्ये जाताना दिसला. त्यामुळे महिलेचा मृत्यू पोलिसांना संशयास्पद वाटत होता. मृत महिलेचा नातू निल गोपाल रायलोबे (वय २६ वर्षे) याने घरातील पाहणी केली. तेव्ही त्याला आजीचे २ मोबाईल, तिचे घड्याळ आणि आजीच्या गळ्यातील सोनसाखळी या वस्तु चोरीस गेल्याचे आढळले. त्यामुळे त्याच्या तक्रारीवरून मालाड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३०२, ३९७, १२०(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.