महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mahesh Tapase On Eknath Shinde मुख्यमंत्र्यांनी भूमीपूत्रांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करावे, योगी आदित्यनाथांवरुन महेश तपासेंचा हल्लाबोल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath Mumbai Visit ) यांनी मुंबईत भेट दिल्यानंतर भाजपवर सर्वच राजकीय पक्षाकडून हल्लाबोल करण्यात येत आहे. शिवसेना, काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीनेही भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Mahesh Tapase Criticized To Cm Eknath Shinde ) यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणुकीचे संरक्षण करावे आणि भाजपच्या कुटील डावाला बळी पडू नये, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

Mahesh Tapase Criticized To Cm Eknath Shinde
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते महेश तपासे

By

Published : Jan 6, 2023, 7:21 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते महेश तपासे

मुंबई -महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Mahesh Tapase Criticized To Cm Eknath Shinde ) यांनी करावे. भाजपच्या कुटील डावाला मुख्यमंत्र्यांनी बळी पडता कामा नये, अशी भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath Mumbai Visit ) यांनी मुंबईत येऊन बॉलिवूड आणि उद्योग उत्तरप्रदेशमध्ये नेण्याचे केलेल्या विधानाचा महेश तपासे यांनी खरपूस समाचार घेतला.

योगी आदित्यनाथ उद्योग, बॉलिवूड पळवण्यासाठी मुंबईतगुजरात पाठोपाठ आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील उद्योग व बॉलिवूड पळविण्यासाठी मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. ज्या बैठका त्यांनी घेतल्या त्यामध्ये त्यांनी उत्तरप्रदेशचे व्हिजन सांगितले. परंतु ही सर्व उत्तरप्रदेशमधून सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी भाजपची रणनीती आहे, असा आरोपही महेश तपासे ( Nationalist Congress Party Leader ) यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यात आलेगुजरातची निवडणूक होती, त्यावेळी महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यात आले आणि गुजरातमध्ये सरकार आणले. आताही लोकसभेची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रातून उद्योग उत्तरप्रदेशमध्ये पाठवण्याचा डाव भाजप रचत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गुजरात प्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये देखील महाराष्ट्रातले उद्योग पळवले जातील का? असा सवाल ही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच लक्ष घालावे. महाराष्ट्रातील गुंतवणूक नोकऱ्या वाचवाव्यात. भाजपच्या या डावाला हाणून पाडण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ( Mahesh Tapase On Eknath Shinde ) करावे असे, आवाहनही महेश तपासे यांनी केले आहे.

योगी आदित्यनाथांनी पाच लाख कोटींचा उद्योग राज्यात नेलायोगी आदित्यनाथ ( Chief Minister Yogi Adityanath ) चार आणि पाच जानेवारीला मुंबईत जी - 20 समिटमध्ये सामील झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये व्यावसायिक उद्योजक आणि बॉलीवूडने गुंतवणूक करावी, काम करावे यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उद्योजक अभिनेते दिग्दर्शकांची भेट घेतली. या दोन दिवसाच्या भेटीत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशसाठी पाच लाख कोटींची गुंतवणूक आपल्या राज्यात नेली. यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. आधी महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला घालवण्यात आले. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन उद्योजकांना त्यांच्या राज्यात घेऊन चालल्याची टीका राज्य सरकारवर होत आहे. सातत्याने महाराष्ट्राला आणि मुंबईला कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातूनच भाजप प्रणित राज्यांमध्ये मुंबई, महाराष्ट्रातले प्रकल्प, उद्योग पळवले जात असल्याचे महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून आरोप केले जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details