जंयत पाटील, नाना पटोले, संजय राऊत यांची पत्रकार परिषद मुंबई : 2024 साली होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत हा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आजच्या बैठकीत आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.
पुन्हा वज्रमुठ सभेचे आयोजन :महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले, शिवसेनेचे संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कर्नाटकात भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. कर्नाटकात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी पुढील निवडणुकांची रणनीती ठरवणार असल्याचे पाटील म्हणाले. पाऊस थांबल्यानंतर पाऊस पाहून पुन्हा वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी म्हणून नुकत्याच झालेल्या सुप्रीम कोर्टातील निकालाचा देखील तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी बसून त्याची चर्चा बैठकीत करण्यात आली. कर्नाटकात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी पुढील निवडणुकांची रणनीती ठरवणार - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
विधानसभा-लोकसभा एकत्र लढणार :आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र लढवणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. निवडणुकीदरम्यान जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांचे नेते चर्चा करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रात देखील भाजपला सत्तेवरुन जनता खाली खेचेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील सरकार कर्नाटक पेक्षा भ्रष्टाचारी :भाजपाच्या खोटे पणाची ओळख कर्नाटकच्या जनतेप्रमाणे देशातील जनतेने ओळखली आहे. कर्नाटकच्या जनतेमध्ये बीजेपीच्या विरोधात राग होता. नरेंद्र मोदी, अमित शहा विरोधात हा राग होता. हे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकमध्ये भ्रष्टाचाराच्या रूपामध्ये 40% टक्के बोलले जात होते. त्याचं प्रकारे आपल्या राज्यात खोके शब्द पाठ झालेला आहे. महाराष्ट्रातील सरकार कर्नाटक पेक्षा भ्रष्टाचारी सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार जनतेच्या पैशाला लुटायला बसलेला आहे.
कर्नाटकातील जनतेचा भाजपवर रोष होता. जनतेने तो मतपेटीतून व्यक्त केला आहे. कर्नाटकातील जनतेचे मोदी-शहा यांच्या यांच्या जोडीला नाकारले आहे. आता महाराष्ट्रात नाकारण्याची गरज आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. पुढील सभा पुणे येथे होणार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
कर्नाटक राज्यामध्ये फक्त काँग्रेस पक्ष जिंकला नाही तर संपूर्ण देशातील विरोधी पक्ष जिंकला असल्याची प्रतिक्रिया हजार संजय राऊत यांनी दिली आहे. काँग्रेसच्या विजयामुळे भाजपाविरोधातील पक्षांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच सरकार कशा पद्धतीने हटवले. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर देखील आजच्या बैठकीत चर्चा झाली. सरकार बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा ठाकरे यांच्या बाजूने असल्याचे आपण समजून घ्यावे. राज्यातील जनतेला आम्ही सांगू जे होत आहे ते चुकीचे होत आहे. ज्याप्रकारे कर्नाटक जिंकले तसे महाराष्ट्र देखील आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. बाकी राहिलेल्या पुणे, कोल्हापूर, वज्रमूठ सभेत महाविकास आघाडीची वज्रमूठ या ठिकाणी दाखवू. जागा वाटपाच्या संदर्भातील चर्चा येत्या काळात जरूर होणार आहे. आज फक्त प्राथमिक चर्चा झालेली आहे. महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद, नाराजी नाही. राज्यातील सरकार 100 टक्के भ्रष्टाचारी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तिन्ही पक्षातील नेते मजबूत असून सत्ताधारी पक्षातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असह्य असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला.
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही कर्नाटकात काँग्रेस नाही, तर देशातील विरोधी पक्ष जिंकला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. ज्या पद्धतीने विरोधी पक्षांने कर्नाटकात भाजपला सत्तेपासुन दुर केले तसे महाराष्ट्रात देखील होणार- खासदार संजय राऊत
संयुक्तरित्या पत्रकार परिषद :मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सिल्वर ओक निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, गुरुजी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खासदार सुप्रिया सुळे इतर महत्वाचे नेते देखील बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर खासदार संजय राऊत, जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली.
- Mahavikas Aghadi : कर्नाटकचा निकाल महाविकास आघाडीला नवसंजीवनी देणार का?
- Uddhav Thackeray : न्यायालयाचा निकाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा; उद्धव ठाकरेंच्या आमदार, पदाधिकाऱ्यांना सूचना
- Mothers Day : समाजाने नाकारलेल्या अनाथ बालकांची "ती" बनली आई