मुंबई - विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसने एका जागेवर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
तिढा सुटला! काँग्रेसची माघार, महाविकास आघाडी 5 जागांवरच लढणार
विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसने एका जागेवर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानपरिषद निवडणूक
काल (शनिवार) काँग्रेसने आपल्या 2 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली होती. मात्र, आज महाविकास आघाडीची बैठक झाली. यामध्ये महाविकास आघाडी 5 जागा लढवणार आहे. यामध्ये शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेस 1 जागा लढवणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक ही बिनविरोध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.