मुंबई :आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षातील सर्व लहान-मोठे पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केलीय. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे नियोजनाबाबत बैठकीचे सत्र सुरू आहे. बैठकीच्या नियोजनाबाबत रविवारी मुंबईत महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयाचा आढावा घेण्यात आला आहे.
बैठकांचे सत्र सुरू : मुंबईतील होणाऱ्या बैठकीच्या तयारीसाठी आज काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत मागील बैठकीचा आढावा घेण्यात आला. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात बैठकीतील कामांच्या विभागणीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच १ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीसाठीच्या तयारीला उद्यापासून सुरुवात केली जाणार आहे. इंडिया आघाडीची बैठक दोन दिवसांची असल्याने सर्व मोठे नेते 31 ऑगस्ट रोजी मुंबईत येणार आहेत. इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांची मुंबईतील पंचतारांकित ग्रँड हयात हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक 1 सप्टेंबर रोजी ग्रँड हयातमध्येच होणार आहे.
इंडिया आघाडीची इंडिया मुंबईत बैठक :आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. बैठक आयोजनाची मुख्य जबाबदारी ठाकरे गटाकडे आहे. तर मविआ मधील ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष तिघेही एकत्रितपणे बैठकीच्या आयोजनाच्या तयारीला लागले आहे.