मुंबई :महापुरुषांचा सतत केला जाणारा अपमान ( Constant insults of great mens), सीमा प्रश्न व महागाई ( Border question and inflation ), बेरोजगारी हे सर्व प्रश्न घेऊन सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारचा ( Shinde Fadnavis government ) धिक्कार करण्यासाठी माहविकास आघाडी (Mahvikas Aghadi ) कडून मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी अद्याप या महामोर्चाला परवानगी दिली नसली तरी सुद्धा या महामोर्चाची तयारी जोरात सुरू आहे. मुंबईत ठीक ठिकाणी या संदर्भामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मुंबईत ठिकाणी बॅनरबाजी :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच शिंदे - फडणवीस सरकारमधील नेते सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम करत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी कडून मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान असा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी या महामोर्चाची तयारी जोरात सुरू आहे. मुंबईत ठिकाणी या मोर्चाच्या संदर्भाने बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी मुंबईभर बॅनरबाजी करायला सुरुवात केली आहे. या महामोर्चाला मुंबई सहित पालघर, पुणे, नवी मुंबई येथून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोक या महामोर्चात समाविष्ट होतील अशी शक्यता असून दीड ते दोन लाखापर्यंत लोक या महामोर्चात समाविष्ट होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.