मुंबई :अवकाळी पावसाने विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये शेती तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांला मोठे नुकसान सोसावे लागले. तसेच प्रशासकीय मिळणारी मदतही वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही, त्यामुळे महात्मा जोतिबा फुले शेतकरी योजनेचा लाभ आता ऑनलाईन मिळणार आहे.
कर्जमुक्ती योजनेची मदत मिळणार :नुकसान माहिती घेण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना माहिती मिळणे कठीण असते. त्यामुळे वेळेची बचत व्हावी म्हणुन महाराष्ट्र शासनाने महाआयटीद्वारे एक संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची मदत मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात मागील चार-पाच वर्षांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा संपल्यानंतरही काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्याचे उदाहरण आहेत. या प्रचंड पावसामुळे तालुका पातळीवर अनेक शेतकऱ्यांना फटका बसला होता. अशा शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी म्हणुन राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
मदत मिळण्यासाठी अडसर :महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना योजनेची मदत मिळण्यासाठी अडसर होत होता. त्याबद्दल स्थानिक,विभागीय पातळ्यावरून आढावा घेतला. त्यानंतर महाआयटी पोर्टलवरून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची ऑनलाईन मदत देण्याबाबत निर्णय घेतला. त्यासाठी तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून महाआयटीचीच नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. यामध्ये वेगाने शेतकऱ्यांना मदती संदर्भातली बाबींची पूर्तता केली जाणार आहे.