मुंबई- महायुतीचे सरकार यावे यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही राहिली. भाजप ऐकत नाही तर सत्तेच्या बाहेर होण्याचे शिवसेने ठरवले. महाशिवआघाडी ही अनैसर्गिक आघाडी आहे. महाशिवआघाडीचे सरकार शरद पवारांमुळे टिकेल, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न कधीचेच पूर्ण झाले आहे. मात्र, आता बाळासाहेबांचे नाव पुढे करून राजकारण करत असल्याची टीका रामदास आठवले यांनी उध्दव ठाकरेंवर केली. काँग्रेसकडून शिवसेनाला पाठिंबा मिळणार नाही, असे वाटले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा, जनतेची कामे त्यांनी करावी. मंत्री पदावरून या महाशिवआघाडीत वाद होतील, असे रामदास आठवले यांनी सांगितले.