महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रदेश भाजपाच्या प्रवक्ते, पॅनेलिस्टची घोषणा; पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना प्रवक्ते पद

या प्रवक्ते पदाच्या घोषणेत विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रातील भाजप विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही महिन्यात अगोदर शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी टीका केली होती

प्रदेश भाजपाच्या प्रवक्ते, पॅनेलिस्टची घोषणा;  पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना प्रवक्ते पद
प्रदेश भाजपाच्या प्रवक्ते, पॅनेलिस्टची घोषणा; पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना प्रवक्ते पद

By

Published : Aug 17, 2020, 6:15 PM IST

मुंबई - भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आगामी काळासाठी प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून यापूर्वीच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली, यानंतर आज 10 प्रवक्ते व 33 चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे.पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना पश्चिम महाराष्ट्रचे प्रवक्ते पद देण्यात आले आहे.

भाजपने जाहीर केलेले प्रवक्ते व पॅनेलिस्ट..

  • मुख्य प्रवक्ता -केशव उपाध्ये
  • प्रवक्ता खा.भारती पवार- उत्तर महाराष्ट्र,
  • आ‍.गोपीचंद पडळकर,पश्चिम महाराष्ट्र,
  • आ. राम कदम– मुंबई,
  • शिवराय कुलकर्णी – विदर्भ,
  • एजाज देखमुख – मराठवाडा,
  • भालचंद्र शिरसाट – मुंबई,
  • धनंजय महाडीक– प. महाराष्ट्र,
  • राम कुलकर्णी– मराठवाडा,
  • श्वेता शालिनी– पुणे,
  • अ‌ॅड. राहुल नार्वेकर – मुंबई.

तसेच पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सदस्य -

गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार,आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीती गांधी.

मीडिया सेल सह संयोजक

  • ओमप्रकाश चौहान
  • याम सप्रे
  • सोमेन मुखर्जी

मीडिया सेल सदस्य

  • देवयानी खानखोजे

या प्रवक्ते पदाचा घोषणेत विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रातील भाजप विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही महिन्यात अगोदर शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी टीका केली होती. यामुळे महाराष्ट्राभर पडळकर यांचाविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. त्यामुळे गोपीचंद हे फार प्रकाशझोतात आले होते. त्यांनाच भाजपने आता पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते पद दिल्याने भाजपची ही खेळी आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details