मुंबई -राज्यात आज (शनिवारी) ४,९२२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,४७,५०९ वर पोहचला आहे. तसेच राज्यात आज ९५ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ४७,६९४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८२,८४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
८२,८४९ अॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज ५,८३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १७,१५,८८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८८ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१२,०५,११८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,४७,५०९ नमुने म्हणजेच १६.४९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,६०,६८५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ५,८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ८२,८४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.