महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Weather Today : पुणे, कोल्हापूरसह या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, विदर्भात पावसाचा धुमाकूळ - Kolhapur Rain status

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक भागातील नद्यांना पूर आला आहेत. हवामान विभागाने कोकणासह विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस राहील असा अंदाज वर्तवला आहे.

पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस
पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस

By

Published : Jul 24, 2023, 8:08 AM IST

Updated : Jul 24, 2023, 8:53 AM IST

मुंबई: पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातार व पुणे जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दिवसभर राहणार पाऊस : राज्यात आज पहाटेपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पाऊस सुरू झाला आहे. काल रात्रीपासूनच मुंबईसह ठाण्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आज दिवसभर पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आज मुंबईसह कोकणाला हवामान खात्याने येलो अ‍ॅलर्ट जारी केला आहे. तर ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे घरातून विनाकारण बाहेर पडू नका,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक भागातील नद्यांना पूर आला आहेत. भारतीय हवामान विभागाने रविवारी रायगड पुण्यासह 8 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी केला होता. ओडिशा-आंध्रप्रदेशचा उत्तर भाग, वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येथील चक्रीय वात स्थिती विदर्भात सक्रीय आहे. त्याचबरोबर पूर्व-पश्चिम वाऱ्याची प्रणाली नैऋत्य मध्यप्रदेश ते आग्नेय राजस्थान या प्रदेशावरील चक्रीय वात स्थितीमुळे मान्सूनला गती मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

ठाणे जिल्ह्यात सरासरी 140 ते 150 टक्के पाऊस: ठाणे जिल्ह्यात सरासरी 140 ते 150 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील काळू आणि उल्हास नद्या धोक्याच्या चिन्हाखाली वाहत असून धरणेही भरू लागली आहेत. तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या आजूबाजूला आणि (तानसा) नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पिकांचे नुकसान: मुसळधार पावसामुळे विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव यवतमाळ नांदेडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान अतिवृष्टीमुळे ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे लवकरात लवकर करावे, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. याचबरोबर अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक सुविधा द्या, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पालघरमध्ये पुरेसा धरणसाठा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा तयार झाला आहे. धामणी धरण 81.64 टक्के भरले आहे. तर कवडास धरण ओव्हरफ्लो झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये 2 हजार 284 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ या नद्यांच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

पावसामुळे 10 दिवसांत 19 जणांचा मृत्यू : महाराष्ट्रातील विदर्भातील काही भागात गेल्या 10 दिवसांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अतिवृष्टीमुळे सुमारे 4 हजार 500 घरांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. मुसळधार पावसामुळे सुमारे 54हजार हेक्टर शेतजमिनीवरही परिणाम झाला आहे. त्यापैकी 53 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र एकट्या अमरावती विभागात आहे. नागपूर विभागात, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी तीन,वर्धा आणि गोंदियामध्ये प्रत्येकी 2 आणि चंद्रपूरमध्ये 13 जुलैपासून एका मृत्यूची नोंद झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.

हेही वाचा -

  1. Maharashtra Rain Updates : कोकणात पावसाचा धुमाकूळ, एनडीआरएफडून राज्यात एकूण 12 टीम तैनात
  2. Pune Sees Lowest Rainfall : चिंता वाढली पुण्यात 10 वर्षातील सर्वात कमी पाऊस, पुढील आठवड्यात बरसण्याची शक्यता
Last Updated : Jul 24, 2023, 8:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details