महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्थसंकल्पीय अधिवेशन : सभागृहातील सर्व घडामोडी पाहा एका क्लिकवर - अर्थसंकल्पीय अधिवेशन लाईव्ह

अर्थसंकल्पीय अधिवेशन
अर्थसंकल्पीय अधिवेशन

By

Published : Mar 5, 2021, 3:40 PM IST

Updated : Mar 5, 2021, 8:17 PM IST

20:10 March 05

शवविच्छेदनाचा अहवाल आला की, सर्व गोष्टी स्पष्ट होतील - अनिल परब

मंत्री अनिल परब काय म्हणाले - 

  • गाडीमध्ये स्फोटके सापडली होती, त्याची चौकशी पोलीस करत आहेत.
  • या प्रकरणात जी गाडी होती, ती गाडी स्कॉर्पिओ होती  
  • गाडी ज्यांची होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह आज सापडला आहे.  
  • शवविच्छेदनाचा अहवाल आला की, सर्व गोष्टी स्पष्ट होतील
  • राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे तपास देण्याची आवश्यकता नाही, राज्य पोलिसांवर विरोधकांनी विश्वास ठेवावा.
  • प्राथमिक माहिती याबाबत घेतली आहे.
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणविसांना सांगितले की, तुमच्याकडे पुरावे असतील तर आम्हाला द्या.
  • सचिन वझे यांच्याबद्दल भाजपला राग का आहे? या प्रकरणाचा तपास सचिन वझे हे करत आहेत
  • केंद्राकडे ते पुरावे देणार आहेत ते त्यांनी द्यावे, केंद्रात त्यांचे सरकार आहे, त्यांच्या अधिकारांमध्ये आम्ही येणार नाही

19:29 March 05

तपास राष्ट्रीय सुरक्षेकडे देण्याची गरज नाही - अनिल देशमुख

देवेंद्र फडणवीस - मृतदेहाचे हात मागे बांधलेले आहेत, अशी आत्महत्या होत नाही.  

अनिल देशमुख - सॅम पिटर न्यूटन हे मूळ मालक आहेत. त्यांनी इंटेरीअरचे काम मनसुख हिराणींकडे दिले होते. मूळ मालक बील देत नव्हता हिराणीने गाडी आपल्याकडे ठेवली होती. हात मागे बांधलेले नव्हते.  

- सचिन वझे हे तपास अधिकारी आहेत, मूळ तपास अधिकारी नाहीत. सचिन वझे अंबांनीच्या घराबाहेर पहिले कसे काय पोहचले?  

देशमुख - फडणविसांनी त्यांच्याकडे काही माहिती असेल तर ती आमच्याकडे द्यावी, मुंबई महाराष्ट्राचे पोलीस तपास करण्यास संरक्षण एनआयएकडे देण्याची आवश्यकता नाही.  

19:25 March 05

मुंबईमध्ये पार्किंग घोटाळा हा मोठा आहे - प्रवीण दरेकर

प्रवीण दरेकर काय म्हणाले - 

वनजमिनीवर आता SRA स्कीम राबवणार याबाबत निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत नगरविकास मंत्री, राज्यमंत्री वन आणि सगळ्या विभागाचे अधिकारी हे बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. मुंबईमध्ये पार्किंग घोटाळा हा मोठा आहे आणि 49 बिल्डरांना वाढीव FSI दिला गेला आहे. त्यांनी तो वाढीव FSI विकला गेला आणि करोडोंचा घोटाळा झाला आणि सरकार कडून याच काय उत्तर आले नाही. 

19:12 March 05

पोलिसांवर विरोधीपक्ष नेत्यांनी विश्वास ठेवावा - अनिल परब

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले - 

क्रॉफर्ड मार्केटला ते कोणाला भेटले, आयो सचिन वझे यांचे फोनवर आधीपासून संभाषण होते हे योगायोग कसे होईल. मी मृतदेह बघितला आहे, त्याचे हात बांधलेले आहेत.  

त्यामुळे तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात यावा.

गृहमंत्री अनिल देशमुख - सचिन वझेंनी अर्णब गोस्वामींना आत टाकले म्हणून तुम्हाला त्याचा राग आहे का?

अनिल परब - मनसुखने पोलिसांना जबाब दिला, तो खरा आहे की नाही पोलिसांना तपास करू द्या. पोलिसांवर विरोधीपक्ष नेत्यांनी विश्वास ठेवावा. ते मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना पोलिसांवर विश्वास होता मग आता विश्वास का नाही?

16:39 March 05

पोलीस आणि रेती माफियांचे संगनमत - देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले -

  • पोलीस आणि रेती माफिया यांचे संगनमत आहे. हे थांबवायला पाहिजे.
  • देशातील सगळे प्रमुख व्यावसायिक मुंबईत राहतात, मात्र मुंबई सुरक्षित आहे का? एक उद्योजक म्हणून मुकेश अंबानी यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. 26 तारखेला जिलेटीनने भरकेली गाडी सापडली होती, पत्र सापडले हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे, मनसुख हिरेन यांची चोरी गेलेली कार अंबानी यांच्या घराजवळ सापडली.
  • टेलिग्राम चॅनलवर एक पत्र आले त्यात त्यांना धमकी देण्यात आली. जैश-उल-हिंद या संघटनेने हे पत्र आपले असल्याचे सांगितले.
  • सचिन वझे तिथे पोहचले नंतर त्यांना आयो म्हणून नेमले. मग तीन दिवसांपूर्वी आयोना का काढलं
  • जुलै महिन्यात दोन नंबरमध्ये संवाद झाला.
  • तो क्रॉफर्ड मार्केटमध्ये एका व्यक्तीला भेटले ती व्यक्ती कोण हे शोधणे गरजेचे आहे.
  • लोकल पोलीस पोहचण्या ठाण्याचे पोलीस सचिन वझे कसे पोहचले त्यांनाच पत्र कसे भेटले.
  • कंगनाच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करणार नाही.
  • पण अनिल गोटे यांच्या व्यक्तव्याची दखल घेतली नाही
  • अनिल गोटे यांनी पोलिसांना शिवीगाळ केली, याचा व्हिडीओ देखील आहे. याची साधी तक्रार देखील दाखल करून घेतली नाही.

16:34 March 05

आर्थिक पाहणी अहवालातील चिंता सरकारने दूर करावी - मुनगंटीवार

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले -   

  • महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला आहे.
  • त्यात आपल्याला चिंता करावी लागणार आहे आणि मी सरकारला दोष देणार नाही कारण आपण गेल्या वर्षी कोरोनामध्ये अडकलो होतो.
  • पण सरकारने पॅकेजेस जाहीर केले पाहिजे होते
  • सरकारने आर्थिकबाबतीत योग्य ते पाऊल उचलावे.
  • सगळ्यांना सरकारने मदत करावी, ही आमची मागणी आहे.
  • आर्थिक पाहणी अहवालातील चिंता सरकारने दूर करावी.

16:13 March 05

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न - देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले - 

  • 50 हजार खरेदी खतांच्या बाबतीत. लोकांची जमीन आपल्या नावे एका व्यक्तीने केली आहे.
  • बनावट स्टॅम्प पेपरच्या नावाने हजारो कोटींचा घोटाळा केला जात आहे.
  • त्यामुळे राज्यात एक नवीन तेलगी आला आहें
  • राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपलब्ध झाले.
  • राज्यातील लोकांना सुरक्षित वाटते का? याचा विचार आम्ही आमच्या काळात केला होता.
  • आज ज्या काही गोष्टी घडत आहेत. 2000 दशकाच्या पहिल्या दोन ते तीन वर्षांत एक तेलगी घोटाळा सुरू झाला होता
  • अजूनही त्याच्या केसेस सुरू आहेत. त्याच नाशिकमध्ये आज नव्याने स्टॅम्प घोटाळा समोर आला आहे.
  • राज्यात एक मोठे रेतीमाफिया कार्यरत आहेत.
  • जाणीवपूर्वक न्यायालयाचे नाव सांगून रेती माफिया केली जात आहे.
  • मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील प्रमुख व्यावसायिक आज मुंबईत राहत आहेत.
  • रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनने भरलेली गाडी सापडली, हा सर्व घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे, यामधील मनसुबा हिरेन हा ठाण्याचा आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी

15:47 March 05

कोविडमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा नितेश राणेंचा आरोप

आमदार नितेश राणे काय म्हणाले - 

  • विरोधी बोलणाऱ्या आमदारांचे, नेत्यांचे फोन टॅप केले जातात. वनाच्या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या जमिनी असल्याने इतरांबाबत काय बोलणार?
  • दिशा सालेनच्या प्रकरणावर काय झाले? सरकारकडून पद्धतशीरपणे काळे प्रकार लपवले जातात. गुन्हेगारांना आपण किती पाठिशी घालणार?
  • कोणता एखादा मंत्री अडकला तर सर्व सरकारची यंत्रणा त्याच्या पाठीशी तयार राहते, त्याची चौकशी होऊ देत नाहीत.
  • पूजा चव्हाण प्रकरणावर सरकारकडून कारवाई होत नाही, उलट संबंधित मंत्री शक्तीप्रदर्शन करून दाखवतात.
  • धारावी कोरोना नियंत्रणामध्ये मुंबई महापालिकेपेक्षा इतर स्वंयसेवी संस्थांनी कामे केली
  • धारावीतील कोरोना नियंत्रणात आणल्याचा खोटा दावा केला जातोय

15:46 March 05

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, पोलिसांवर राजकीय दबाब

मंत्र्यांना वाचवण्याच्या प्रकारामुळेच जनतेमध्ये देखील कायद्याचा धाक राहिला नाही, गुन्हेगार सुटून आल्यावर वाहनांच्या ताफ्यात मिरवणूक निघत आहे. महाराष्ट्र वाढदिवसाला तलवारी नाचवल्या जात आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गावठी पिस्तुल असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात महिला अत्याचार वाढ झाली आहे. गृहमंत्र्यांनी दबाब झुगारून कायदा व सुव्यस्थेकडे लक्ष द्यायला हवा., असे आवाहन विरोधकांनी केले.

15:46 March 05

महापालिकेचा प्रशासक विहित कालावधीसाठी नियुक्त करण्याची मागणी

महानगर पालिका आणि नगरपरिषदामध्ये कोरोना काळात निवडणूक टाळून प्रशासक नेमण्यात आले आहेत.

नवी मुंबई, संभाजीनगर या ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सरकारने सर्व अधिकार हाती घेतले असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. सोलापूरमध्ये स्थायीची बैठक ढकलणे म्हणजे सरकार बहुमताच्या जोरावर स्वैराचार करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

देशभरात अनेक ठिकाणी निवडणुका होत आहेत., मग महानगर पालिका निवडणुकीच्या निवडणुकांनाच का कोरोनाचे कारण दिले जात आहे. हे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने महापालिकेवर प्रशासक कालावधीची तारीख निश्चित करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

मुंबई औऱगांबाद या ठिकाणी महापालिकेत प्रशासक नेमणूक करून तुम्ही तुमच्या नगरसेवकांच्या मतदार संघात निधी दिला जात असल्याचा आरोप ही फडणवीस यांनी सभागृहात केला.

15:41 March 05

महाराष्ट्र आर्थिक पाहणी प्रकाशन 2020 -21 सभागृहापुढे

  • अर्णब आणि कंगना राणावत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रकरणाचा अहवाल पुढील अधिवेशनात मांडला जाणार

प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात दाखल केलेले हक्कभंग आणि अवमान प्रकरण, तसेच कंगना रणौत प्रकरणी हक्कभंग आणि अवमान प्रकरणाची विशेष अधिकार समितीचे अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत मुदत वाढ मागितली. सभागृहाने पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढ करून देण्यात आली आहे.

  • महाराष्ट्र आर्थिक पाहणी प्रकाशन 2020 -21 सभागृहापुढे ठेवण्यात आले
  • पीक विम्यासाठी लावण्यात आलेले निकष बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना पीकविमा देण्याची विरोधकांची मागणी -

फक्त विमा कंपनींना पत्र देऊन शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही, या संदर्भात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार का? विमा कंपन्यांना आपण नियम ठरवावे कारण सरकार स्वत: निम्मे पैस विमा कंपन्यांना भरते. मग आपण विमा कंपन्यांची मनमानी का सहन करायची असा सवाल विरोधकांनी केला. तसेच सरकारने स्वत:ची विमा कंपनी काढावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यावर केंद्राला विनंती केली असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.

15:38 March 05

विमा कंपन्यांना ७२ तासानंतरचे नुकसानीचे अहवाल पात्र धरण्यास कृषी विभागाची सूचना - दादा भुसे

नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत पीक विम्यासाठी कंपनीकडे माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकारने केलेल्या पाहणी अहवाल ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पीक विम्यास पात्र ठरण्यास विमा कंपन्यांना कळवले असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात सांगितले.

विमा घेताना कंपनीचे कर्मचारी उपस्थित असतात, मात्र पिकाचे नुकासन होते , त्यावेळी विमा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित नसतात. त्यामुळे ७२ तासांच्या नुकसानीची माहिती देण्याची अट शिथील करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली. यावर ७२ तासानंतरही शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीने ग्राह्य धरावे असे पत्र दिले असल्याची माहिती कृषीमंत्री भुसे यांनी दिली.

15:28 March 05

विरोधकांनी सभागृहाच्या प्रवेशाद्वारवर केले आंदोलन

मुंबई- राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस विरोधकांच्या विरोधामुळे गाजण्याची शक्यता आहे. आज सकाळीच विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती मराठा आरक्षण आणि राज्यातील स्त्री अत्याचाराविरोधात सरकारला घेण्यासाठी आंदोलन केले. त्यामुळे आजचा दिवस हा वादळी होण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवशेनाचा आज पाचवा दिवस आहे. आज सभागृहात मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यात आली.  

राज्याचा अर्थसंकल्प अहवाल देखील मांडण्यात येणार आहे त्यामुळे आजचा दिवस चर्चेचा राहणार आहे.

Last Updated : Mar 5, 2021, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details