मुंबई - मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्याची संख्या जास्त आहे. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आणि रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांना 10 हजार रुपये आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघात वाढत चालले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. वाहनांच्या वेगावर नियंत्रण असावे, असे वारंवार सांगून सुद्धा त्याकडे वाहनधारक दुर्लक्ष करतात. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात गंभीर स्वरुपाचे अपघात घडण्याचे प्रमाण विचारात घेऊन परिवहन विभागाने ड्रिंक अँड ड्राइव्हचा दंड वाढवला आहे.
टॅक्स आणि रिक्षाचे नवे परवाने देणे बंद -