महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Deepali Sayyed on BJP : दीपाली सय्यद यांनी ट्विट करून भाजपला पुन्हा डिवचले - भाजप निशाण्यावर

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Shiv Sena leader Deepali Sayyed) आणि भाजप (BJP) यांच्यात सध्या जोरात शाब्दिक वॉर सुरू आहे. आजही भाजपच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका (Criticism Of BJP Leaders) केली. महाराष्ट्राद्रोह्यांनो तुम्हाला भोसल्यांची लेक पुरून उरेल, असा इशाराच दीपाली सय्यद यांनी ट्विट करून (Tweet By Deepali Sayyed) दिला आहे. त्यामुळे नक्कीच भाजप आणि सय्यद यांच्यात जुंपणार आहे.

Shiv Sena Leader Deepali Syed
शिवसेना नेत्या दीपाली सय्यद

By

Published : Jun 3, 2022, 4:53 PM IST


मुंबई :शिवसेना नेत्या दीपाली सय्यदआणि भाजप यांच्यात सध्या शाब्दिक वॉर सुरू (Verbal war between Deepali Sayyed and BJP) आहे. आजही भाजपच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. महाराष्ट्राद्रोह्यांनो तुम्हाला भोसल्यांची लेक पुरून उरेल, असा इशाराच दीपाली सय्यद यांनी ट्विटरवरून दिला आहे. त्यामुळेभाजप आणि सय्यद यांच्यात जुंपणार आहे.

दीपाली सय्यद यांनी भाजपला दिलेली सडेतोड उत्तरे : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद विरोधकांवर सातत्याने टीका करीत आहे. मुख्यमंत्री, शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपवर निशाणा साधण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. मध्यंतरी किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. सय्यद यांनी सोमय्यांना सडेतोड उत्तरे दिली होती. नुकतेच अंगावर आले तर शिंगावर घेऊ, मुख्यमंत्रींबद्दल बोललात तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ, असे आव्हान सय्यद यांनी दिले होते. तसेच, दिल्लीला हुजऱ्या करणाऱ्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून देऊ. दिल्लीसमोर झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही, अशा शब्दांतही भाजपला इशारा दिला होता.

भोसल्यांची लेक पुरून उरेल : आता शिवसेना नेत्या सय्यद यांनी नवीन ट्विट करीत, भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिल्लीतल्या बापाला प्रत्युत्तर केले, तर यांना झोबते, जेव्हा किरीट बोंबलत फिरते, कमळाबाई कुठे लपून बसते. लबाड लांडगं ढोंग करतंय, महाराष्ट्र प्रेमाचं सोंग करतंय, महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरेल, असेही सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा :Threats To Deepali Sayyad : 'मला जीवे मारण्याची धमकी, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार करणार' - दीपाली सय्यद

ABOUT THE AUTHOR

...view details