महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

३ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

विविध मागण्यांसाठी गेल्या ३ दिवसांपासून महाराष्ट्र सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र ३ दिवस झाले तरी एकही सरकारची व्यक्ती या आंदोलनकर्त्यांना भेटायला आलेली नाही.

३ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

By

Published : Aug 10, 2019, 3:42 PM IST

मुंबई - राज्यातील १४ सुरक्षा रक्षक मंडळांचे एकत्रीकरण करावे, पगारवाढ करावी, दर्जेदार खाकी गणवेश असावा या मागण्यांसाठी गेल्या ३ दिवसांपासून महाराष्ट्र सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्यावतीने आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे बसले आहे. मात्र ३ दिवस झाले तरी एकही सरकारची व्यक्ती या आंदोलनकर्त्यांना भेटायला आलेली नाही.

३ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील रक्षकांना खाकी गणवेश देण्याबाबतचा निर्णय राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार मंडळाच्या बैठकीत गेल्याच वर्षी झाला. त्यानुसार मंडळाकडील ८० लाखाचे शिल्लक असलेले कापड गणवेशसाठी निश्चित केले. तसेच इतर मागण्या ही पूर्ण करू असे आश्वासन दिले पण सरकारने अद्याप पूर्ण केले नाही. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या आंदोलनातही अश्वासने देण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा गेल्या ३ दिवसांपासून राज्यातील सुरक्षा रक्षक आंदोलनाला बसले आहेत.जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या अध्यक्षा आश्विनी सोनवणे यांनी सांगितले.

सुरक्षा रक्षकांच्या मागण्या -

  • राज्यातील १४ सुरक्षा रक्षक मंडळे एकत्र करावे.
  • सल्लागार मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार दर्जेदार खाकी गणवेश मिळावा.
  • प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला वेतन मिळावे.
  • पगारवाढ मिळावी.
  • सुरक्षा रक्षकांना नोंदणीक्रमांक मिळावा.
  • एस.आय.सी. आणि ग्रॅज्युटीची अंमलबजावणी करावी.

ABOUT THE AUTHOR

...view details