महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra State Police Anniversary Celebration : महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा, राज्यपालांकडून महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक - महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन

'एकूणच समाजाप्रमाणे पोलीसांमध्ये देखील थोड्या फार उणिवा असल्या तरी, व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास राज्य पोलीस अभिनंदनास (Governor Appreciate to Maharashtra Police) पात्र आहेत,' असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन' साजरा (Maharashtra State Police Anniversary Celebration) करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

Maharashtra State Police Anniversary Celebration
राज्यपालांकडून महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक

By

Published : Jan 2, 2023, 6:15 PM IST

महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा

मुंबई : राज्याचे पोलीस दल संपूर्ण देशात सर्वश्रेष्ठ मानले जाते. सैन्य दलांच्या जवानांप्रती लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच भावना राज्याच्या पोलीसांप्रती देखील आहे. करोना प्रकोपाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस यांच्या प्रमाणेच राज्यातील पोलीसांनी देखील जीवाची पर्वा न करता कार्य केले. त्यामुळे एकूणच समाजाप्रमाणे पोलीसांमध्ये देखील थोड्या फार उणिवा असल्या तरी देखील व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास राज्य पोलीस अभिनंदनास (Governor Appreciate to Maharashtra Police) पात्र आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन' साजरा (Maharashtra State Police Anniversary Celebration) करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा



राज्यपालांचे आवाहन : गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये पोलीस दलातील आव्हाने वाढली आहेत. सागरी सुरक्षा, नक्षलवाद यांसारखे धोके आहेतच. त्याशिवाय सायबर सुरक्षा, युवकांमध्ये वाढती नशाखोरी आदी नव्या आव्हानांमुळे पोलिसांना दुप्पट सतर्क राहणे गरजेचे आहे. राज्य शासन पोलीस दलाचे आधुनिकीकरण करीत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती देखील होत आहे. पोलीसांनी कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, राज्य तसेच देश अधिक सुरक्षित करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. आपल्या कृतीतून राज्य पोलिसांनी गीतेतील 'परित्राणाय साधुनां, विनाशाय च दुष्कृताम' हे ब्रीद सार्थक केले असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा



२ जानेवारी १९६१ : भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे २ जानेवारी हा दिवस 'पोलीस वर्धापन दिन' म्हणून साजरा केल्या जातो, असे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. १ जानेवारी १८२७ रोजी तत्कालीन गव्हर्नर माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असताना बॉम्बे डिस्ट्रिक्ट पोलीस दलाची स्थापना केली होती. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद वाक्य असलेल्या राज्य पोलीस दलाच्या अंतर्गत १२ पोलीस आयुक्तालय व ३७ जिल्हा पोलीस दल असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांतर्फे सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसेच महिला, लहान मुले व वरिष्ठ नागरिकांसंबंधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा



अनेक कार्यक्रमांचे आयोजन : सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. संचलनामध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, निशाण टोळी, महिला पोलीस व बँड पथक सहभागी झाले होते. यावर्षी बँड पथकाकडून स्वतंत्र वादन, कमांडोज तर्फे मौखिक आदेशाविना सशस्त्र कवायत तसेच श्वानपथकातर्फे गुन्हे अन्वेषण व प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कार्यक्रमाला बृहनमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच मुंबई पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, पोलीस जवान व निमंत्रित उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा

ABOUT THE AUTHOR

...view details