महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाभिक समाजासाठी महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळाची स्थापना; मंत्री डॉ. संजय कुटेंची घोषणा - सुधीर राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व ओबीसी, व्हीजेएनटी, विभाग कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ओबीसी, व्हीजेएनटी, विभाग कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे

By

Published : Sep 16, 2019, 9:42 PM IST

Updated : Sep 16, 2019, 10:03 PM IST

मुंबई- राज्यातील नाभिक समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळाची स्थापना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याची घोषणा आज ओबीसी, व्हीजेएनटी, विभाग कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी मुंबईत केली. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील श्यामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती केल्याची माहितीही डॉ. कुटे यांनी दिली.

ओबीसी, व्हीजेएनटी, विभाग कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व ओबीसी, व्हीजेएनटी, विभाग कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी नागपूर येथील सुधीर उर्फ बंडू राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा- भिडेंसह इतर आरोपींच्या विरोधात ११ नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करा - मुंबई उच्च न्यायालय

नाभिक समाजाने महाराष्ट्र सरकारला दिलेल्या निवेदनानुसार राज्यात नाभिक समाजाची जवळपास ३५ लाख इतकी लोकसंख्या आहे. नाभिक समाजाच्या सदस्यांना आर्थिक प्रगतीसाठी मदत करणे, त्यांच्या पारंपरिक व्यवसाय आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देणे, व्यवसायासाठी आवश्यक साधन सामुग्री देणे ही कामे प्राधान्याने या मंडळामार्फत करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. कुटे यांनी दिली.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांपेक्षा 'देशहित' शरद पवारांना जास्त कळते - नवाब मलिक

कोकणातील श्यामराव पेजे इतर मागासवर्ग मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून कोकणातील कुणबी समाजाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या या महामंडळाच्या पाठीशी राज्य सरकार नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहे. राज्यातील ओबीसी आणि विशेषतः कोकणातील कुणबी समाजासाठी एक महत्वाचे महामंडळ म्हणून श्यामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची ओळख आहे. या महामंडळाची नोंदणी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत एक उपकंपनी म्हनून नोंदणी करण्यात आली आहे. विश्वनाथ पाटील हे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील रहिवासी आहेत. कोकणातील इतर मागासवर्गीय आणि विशेषतः कुणबी समाजाच्या विकासासाठी पाटील यांनी दीर्घकाळ काम केले असल्याचे डॉ. कुटे यांनी सांगितले.

हेही वाचा- कोल्हापुरात मुख्यमंत्री अन् महसूलमंत्र्यांच्या बॅनरवर फासले काळे

Last Updated : Sep 16, 2019, 10:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details