महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात ४,२३७ नवीन रुग्णांचे निदान; १०५ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज २,७०७ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १६,१२,३१४ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत.

महाराष्ट्र कोरोना आढावा
महाराष्ट्र कोरोना आढावा

By

Published : Nov 14, 2020, 7:33 PM IST

मुंबई - आज राज्यात ४,२३७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७,४४,६९८ वर पोहचला आहे. राज्यात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची टक्केवारी १७.९ टक्के इतकी आहे.राज्यात आज १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४५,९१४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

किती आहेत अॅक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज २,७०७ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १६,१२,३१४ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण १०५ मृत्यूंपैकी ५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२ मृत्यू हे आठवड्यातील तर ४३ मृत्यू हे एक आठवड्यापुर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८५,५०३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण संख्येचे प्रमाण -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची तर २६ ऑक्टोबरला ३६४५ सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. ७ नोव्हेंबरला ३,९५९ त्यानंतर आज ३,७९१ इतके कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details