महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra monsoon Rain : मुंबई, ठाण्यात पावसाचा दिवसभर मुक्काम, आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या कुठे आहे रेड अलर्ट - जाणून घ्या पावसाचे अलर्ट

राज्यात मुंबईला आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, भंडारा, गोंदिया या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

By

Published : Jul 28, 2023, 8:10 AM IST

मुंबई: मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. गुरुवारी दिवसभर झालेल्या संततधार पावासमुळे काही भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर काही जिल्हा प्रशासनांनी शाळा, कनिष्ठ आणि महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. यामध्ये रत्नागिरी, रायगड, नांदेड, ठाणे मुंबई आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान विभागाने मुंबईला आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट दिला आहे.

येथे आहेत हे अलर्ट: हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तसेच गोंदिया जिल्ह्यालादेखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत धो-धोर बरसतोय पाऊस: मुंबईत गुरुवारी झालेल्या पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले. पाणी तुंबल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. दक्षिण मुंबईमधील मरीन लाइन्सजवळील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. मरिन लाईन्स आणि इतर काही ठिकाणी साचलेले पाणी उपसण्यासाठी पालिकेने पंप लावले होते. उपनगरांच्या तुलनेत मुंबई शहरात पावसाचा जोर जास्त होता. बुधवारी सकाळी साडे आठ ते गुरुवारी सकाळी साडेआठ या 24 तासामध्ये कुलाबा केंद्रात सरासरीव 223.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. याच काळात मुंबई उपनगरामध्ये 145.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहेत.

कामशेत बोगद्याजवळ ढिगारा कोसळला: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्याजवळ मातीचा ढिगारा कोसळला आहे. गुरुवारी रात्री रात्री पावणे 9 वाजता संबंधित घटना घडली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. पहिली घटना 23 जुलैला रात्री साडेदहा वाजता घडली होती. त्यावेळी मुंबई मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड पडली होती. तर दुसरी दरड त्याच मध्यरात्री 0 लोणावळ्याजवळ दरड कोसळली होती. चार दिवसानंतर गुरुवारी ही तिसरी घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, वाहतूक ही सुरळीत सुरू आहे.

नांदेडमध्ये जोरदार पाऊस: नांदेडमध्ये गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 60-70 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. नांदेडच्या सातही मंडळांमध्ये दिवसभर जोरदार पाऊस झाला, त्यामुळे काही गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले. असना नदीला पूर आल्याने काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतला पिकांच्या नुकसानीचा आढावा : नागपुरात मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. या भागाची पाहणी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस नागपूरचे पालकमंत्री आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी शहराच्या महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. नागरिकांना त्वरीत दिलासा देण्यासाठी पंचनामा करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा-

  1. Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकूळ, एनडीआरएफच्या 13 तुकड्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तैनात
  2. Rainfall Red Alert for Mumbai : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, शाळा कॉलेजला उद्या सुट्टी
  3. Maharashtra Rain update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट; तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details