महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Monsoon Rain : आज राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, वसई विरारला रेड अलर्ट तर मुंबईला ऑरेंज अलर्ट - पालघर जिल्ह्यातील पावसाचे अपडेट

राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.

आज राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता
आज राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

By

Published : Jul 22, 2023, 7:41 AM IST

वसई विरारला रेड अलर्ट

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून धुवांधार पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला तर काही ठिकाणी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाऊस होत नसल्यामुळे नाराज झालेल्या शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान हवामान विभागाने आजही राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागामार्फत पालघर जिल्ह्यासह वसई विरारमध्ये आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. याचबरोबर पुणे तसेच कोकणातील रत्नागिरी तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शाळांना सुट्टी : पालघर जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता सर्व अंगणवाड्या तसेच सर्व सरकारी आणि खासगी शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होणे, झाडे उन्मळून पडणे, विद्युत खांब पडणे इत्यादी गोष्टींमुळे काही अपघात होण्याची शक्यता असते.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज : वसई विरार शहरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने शनिवारी देखील वसई विरारमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. यामुळे महानगरपालिकेमार्फत अतिवृष्टीच्या वेळी उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. अतिवृष्टीच्या काळात अत्यावश्यक काम असल्याशिवाय कृपया नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे. रेड अलर्टचा इशारा असल्यामुळे वसई विरारसह पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकार्‍यांनी सु्ट्टी जाहीर केली आहे. सलग चौथ्या दिवशी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खासगी शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Rain: राज्यात पावसाच जोर राहणार कायम, 'या' 3 जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत अतिवृष्टीची शक्यता
  2. Nanded Rain: नांदेडच्या काही भागात मुसळधार पाऊस; 12 गावांतील पूरसदृश परिस्थितीमुळे 1000 लोकांचे स्थलांतर
  3. School Closed News : मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये बारावीपर्यंत शाळांना सुट्टी, जाणून घ्या शिक्षण विभागाचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details