मुंबई:गेल्या दोन दिवसांपासून प्रसार माध्यमावरती विदर्भातील काही नेते दिल्लीत जाऊन बसले आहेत. नाना पटोले हटाव अशा पद्धतीची मोहीम त्यांनी हातात घेतली बातम्या झळकत आहेत. आता देशातील अध्यक्षांची निवड झाली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यानंतर देशाची कार्यकारणी जाहीर होणार आहे. त्यानंतर राज्यातील अहवाल मागवला जाईल असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. जाणीवपूर्वक नाना पटोले हटाव मोहिमाच्या बातम्या द्यायचा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला बदनाम करायचं काम विरोधी पक्षाकडून केले जात आहे. अशा प्रकारची कोणती मोहीम सुरू नसून विदर्भातील पक्ष वाढीस संदर्भामध्ये विदर्भातील नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षश्रेष्ठींना भेटायला गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी केले आहे.
काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी आमदारांना तंबी द्यावी. गुरुवारी उद्धव ठाकरे गटाचे काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले होते. भेटी वेळेचा एक व्हिडिओ भाजप आमदार नितेश राणे ट्विटरवर पोस्ट केला आहे. ठाकरे गटाचे आमदारांनी नाना पाटील यांच्या संदर्भात काही स्टेटमेंट केले आहे. त्यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी उत्तर दिले आहे की, उद्धव साहेब वरून दोस्ती आणि आतून दोस्ती कुस्ती असं जर करायचं असेल हे निश्चितपणे चुकीचे आहे. आपण आपल्या आमदारांना समज द्यावी.
अंबादास दानवे हे जे बोलत आहेत. ते अतिशय चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांनी आमदारांकडे लक्ष देऊन पुढे अशी गोष्ट घडणार नाही अशी प्रकारची तंबी राहिलेल्या आमदारांना दिली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे-काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी
आशिष देशमुख यांनी सर्वात पहिली हटविण्याची केली मागणी-नाना आणि पक्षांतर्गत वाद नवा नाही. विदर्भातील काँग्रेस नाना पटोले यांची फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्याकाळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. नानांकडे जबाबदारी आल्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रारी वाढल्या. सर्वात पहिले काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी नानांच्या कार्यपद्धती वरती प्रश्नचिन्ह निर्माण करत नानांना हटवा अशी मागणी केली.
नानांच्या कार्य प्रणालीवर शंका-विधान परिषद निवडणूक वेळी देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्र काँग्रेस निरीक्षक रमेश चिन्नीथाला काँग्रेसच्या 21 नेत्यांनी भेट घेऊन नानांना हटवा अशा प्रकारची मागणी केली होती. त्यातच आता विदर्भातीलच नेत्यांकडून नानांच्या कार्य प्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नाना पटोले यांना विरोध झाला आहे.
अंतर्गत गटबाजी भोवणार- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. याचं पूर्ण श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांना जाते. दोघा नेत्यांनी चांगल्या पद्धतीने भारत जोडो यात्रेची जबरदस्त तयारी केली होती. त्यामुळेच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी झाली. त्याचा परिणाम देखील त्यानंतर झालेल्या काही निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. उदाहरण द्यायचं झालं तर बाजार समिती असो किंवा पोट निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. स्थानिक पातळीवर च्या निवडणुकीमध्ये मिळालेले यशाचे श्रेय या स्थानिक नेत्याला जात असतं तसंच अपयश येतं तेव्हा देखील त्याचा श्रेय या स्थानिक नेत्याला जात असते. त्यामुळे नाना पटवले यांची स्ट्रॅटर्जी त्या काळात कामाला आली. मधल्या काळामध्ये खूप घडामोडी घडल्या नानांनी दिल्लीवारी केली. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्याने नानांचे पद कायम राहे.
विजय वडेट्टीवार हे अतिशय महत्त्वाकांक्षी -राजकीय विश्लेषक विवेक भावसार म्हणाले, मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. नाना पटोले यांना मात्र दिल्लीचा आशीर्वाद होता. आता विदर्भातील नेत्यांनीच नानांच्या विरोधामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार केली आहे. या नेत्यांमध्ये विजय वड्डेटीवार, सुनील केदार, शिवाजीराव मोघे यांचा समावेश होता. खरे तर मोघेही थकले आहेत. त्यांनी आता सक्रिय राजकारणातून बाहेर जायला हवे. विजय वडेट्टीवार हे अतिशय महत्त्वाकांक्षी आहे, अनेक पदे दिले त्यासोबत मंत्रिपद देखील दिले. विदर्भात कायमच नाना पटोले विरुद्ध विदर्भातील नेते त्यात विजय वडेट्टीवार, नितीन राऊत अशा प्रकारचा वाद नेहमीच पाहायला मिळत आहे.