मुंबई - विरोधी पक्षनेते अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला आहे. शरद पवार यांना अजित पवार यांनी अल्टिमेटम दिला होता. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची धुरा दिला नाही. त्यामुळे अजित पवार हे नाराज होते अशी माहिती मिळत होती. त्यात आता राजकीय भूकंप झाला आहे.
अजित पवारांचे दबावतंत्र - राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर काम करण्याबाबत सूचक वक्तव्य केले होते. यानंतर आता अजित पवार या पदासाठी दबावतंत्राचा वापर करत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप होण्याची शक्यता आहे.
शिंदे, फडणवीस राजभवनात -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राजभवनाच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडणार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवारांनी केली होती. त्यानंतर अजित पवार पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.