महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar Book : जनतेने मला ५६ वर्षे राजकारणात ठेवले- शरद पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा - Political reactions on lok maze sangati

लोक माझे सांगातीच्या पहिल्या भागात शरद पवार यांनी भाजपबाबत गौप्यस्फोट केला होता. आज प्रकाशित होणाऱ्या सुधारित आवृत्तीत पहाटेचा शपथविधीसह इतर अनेक बाबींवर मोठे खुलासे होणार आहेत.

शरद पवार पुस्तक प्रकाशन
Sharad Pawar Book

By

Published : May 2, 2023, 11:37 AM IST

Updated : May 2, 2023, 12:45 PM IST

मुंबई -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचे आज प्रकाशन सोहळा पार पडला आहे. आजपर्यंतच्या कारकीर्दीत अनेक गौप्यस्फोट करणारे शरद पवार या पुस्तकातून काय गौप्यस्फोट करणार आहेत, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय कारकीर्द कशी घडली याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. पवार म्हणाले, की जनतेने मला ५६ वर्षे राजकारणात ठेवले. पहिल्यांदा १९७२ मध्ये मला तिकीट मिळाले. नववीत असताना पहिला मोर्चा काढला. गोवा मुक्ती संग्रामत पहिला संघर्ष केला. सार्वजनिक जीवनता शिकायला मिळाले. माझे घर काँग्रेसच्या विचारसरणीची व शेतकरी कामगार पक्षाच्या विसरणीचे होते. १९३६ साली लोकल बॉडीत महिलांसाठी एक जागा होती. माझी आई शेकाप व डाव्या विचारसणीची होती. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराकडे आकर्षित झालो. यशवंतरावांनी महाराष्ट्रात मंगलकलश आणला. कॉलेज जीवनात चळवळीत सहभाग घेतला. संघटनेत काम करण्याच्या संधी मिळाली.

तो विषय संपला-पहाटेच्या शपथविधीबाबतदेखील आत्मचरित्रात लिहिले आहे. माझ्या संमतीनेच शपथविधी होत असल्याची समजूत करून देण्यात आली होती. त्याबाबत उद्धव ठाकरेंना फोन करून माहिती दिली होती. मुख्यमंत्री पदावरून सेनेत वादळ होईल, याची उद्धव ठाकरेंना कल्पना नव्हती. बंड शमविण्याआधी त्यांनी माघार घेतली याकडे त्यांनी लक्ष वेधले. अजित पवार भावनाप्रधान आहेत. त्यामुळे भावनेच्या भरात त्यांनी निर्णय घेतला असावा.मात्र, ते पाऊल सरकार स्थापनेकडे होईल, असे वाटले नव्हते. सरकार स्थापनेबाबत काँग्रेसची भूमिका आडमुठेपणाची होती. त्यामुळे संयम ठेवणे अवघड होते, अस पवारांनी आत्मचरित्रात म्हटले आहे. अजित पवारांचा मुद्दा हा कौटुंबिकदेखील होता. त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यामुळे या विषयावर पडदा पडल्याची भूमिका पवारांनी पुस्तकात व्यक्त केली.

शिवसेना-भाजपच्या युतीबाबत काय म्हटले?राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या पन्नास उमेदवारांपुढे बंडखोरांचे आव्हान निर्माण केले होते. बहुतांश बंडखोरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने पाठबळ मिळाल्याचे दिसत होते, असे निरीक्षण शरद पवारांनी पुस्तका नोंदविले. सातत्याने शिवसेना नेत्यांमध्ये भाजपकडून पक्ष संपविण्याचे प्रयत्न चालू असल्याने सेनेच्या नेत्यामध्ये संताप व्यक्त केला जात होता. परंतु सत्तेत आल्यानंतरही ही अंतर्गत आग धुमसत होती, असा दावा पवार यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

काय आहेत राजकीय प्रतिक्रिया-काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका आडमुठेपणाची होती, हा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यामुळे निर्णय प्रक्रियेत वेळ लागल्याचे त्यांनी एका माध्यमाशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, पवारांच्या पुस्तकाशी चर्चा होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. आपणही पहाटेच्या शपथविधीवर पुस्तक लिहिणार आहे, अशी फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा कोंडीत सापडण्याची शक्यताराज्यात सत्तेसाठी वेगवेगळ्या प्रकारची समीकरण सत्तासंघर्षानंतर जनतेने पहिली आहेत. 2019 निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळवूनही भाजपा अडीच वर्ष सत्तेबाहेर राहिला होता. शिवसेना फुटल्यानंतर भाजपा सोबत जाऊन पुन्हा सत्तेत बसली आहे. भाजपा सत्तेसाठी काय राजकारणातील डाव अवलंबू शकतात अशा प्रकारचे दावे शरद पवारांच्या पुस्तकात करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पुस्तकातील दाव्यामुळे राज्यातील भाजपा कोंडीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




केंद्रातील सरकार हिटलरशाही- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुस्तक प्रकाशन यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता पार्टीला देशातील राज्यातील प्रादेशिक पक्ष ठेवायचे नाहीत. प्रादेशिक पक्ष सगळे संपवायचे. देशातील लोकशाही संपवायचे आहे. देशात लोकशाही हुकूमशाही कडे घेऊन जायची आहे. केंद्रातील सरकार हे हिटलरशाही सरकार आहे. त्याचमुळे देशातील राज्यातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवून पुन्हा एकदा हिटलरशाही सरकार आणायचे आहे. त्यासाठी सगळे सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.



राजकीयदृष्ट्या लबाडी म्हणायची की धूर्तपणा? -उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन शिवसेना व भाजपमध्ये वाढणारे अंतर हे आमच्यासाठी शुभ संकेत होते असे नुकतेचराष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्राचा जो काही भाग प्रसिद्ध झाला आहे त्यात म्हटले आहे. दुसऱ्याचे अंध:पतन होत असेल तर लाभ पाहणाऱ्या या नजरेला काय म्हणायचे ते महाराष्ट्रातील जनतेने ठरवावे. दुसऱ्याचे वाटोळे होत असेल व त्यात कोणाला शुभ संकेत दिसत असतील तर यास राजकीयदृष्ट्या लबाडी म्हणायची की धूर्तपणा? हा ही प्रश्न येथे उपस्थित होतो. शेवटी ते पवार साहेब आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुस्तक प्रकाशना अगोदर महाविकास आघाडी आणि शिंदे भाजपा कडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. पुस्तकाचे दावे भाजप -शिंदे सरकार कसे खोडून काढता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा-Maharashtra Politics News: पवार आणि ठाकरे कुटुंब सोडून 'या' कुटुंबातदेखील झाले काका पुतणे वाद, जाणून घ्या ही कुटंबे आणि वादाची कारणे

Last Updated : May 2, 2023, 12:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details