मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंडखोरी केली शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांना गुवाहाटीचे दर्शन घडवले. सुरुवातीला शिंदे यांच्यासोबत 22 आमदार होते. ते सुरतमध्ये एका पंचतारांकित हॉटेलात थांबले. मात्र, जशी बंडखोर आमदारांची संख्या वाढायला लागली तसा या सर्वांचा मुक्काम गुजरातच्या सुरतेहून थेट आसामच्या गुहाटीमध्ये हलवण्यात आला.शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचा राजकारण रोज नवे वळण घेत आहे. आतापर्यंत शिवसेना विरुद्ध भाजप अशा सुरू असलेल्या या लढाईत आता मनसेच देखील नाव येऊ लागले आहे.
का आली मनसे चर्चेत ? :विधानपरिषद निवडणूकीचा अनेपेक्षित निकाल समोर आला. यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहे असे चित्र असताना अचानक एकनाथ शिंदे यांनी सुरतला केलेले बंड सर्वाना आचर्याचा धक्का देणारे होते. दरम्यान हा गट मनसेमधे जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागाला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ३ वेळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली अशी माहीती समोर आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सातत्याने राज ठाकरे यांचे कौतुक केले. त्याच्या पुढचे पाऊल म्हणजे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे शिंदे गट मनसेत सामील होणार का? अशा चर्चाना उधाण आले आहे.
मनसे जवळचा तिसरा पर्याय :शिंदे गटाकडे बहुमत असले तरी सर्व आमदारांचे सदस्यत्व टिकवण्यासाठी कोणत्यातरी सक्रिय पक्षात सामील होणे गरजेचे आहे. पहिला पर्याय त्यांच्याच सोबत असलेले बच्चू कडू यांचा प्रहार. परंतु प्रहार हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पर्याय नाही. दुसरा पर्याय उरतो तो भाजपा परंतु तसे केल्यास या आमदारांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल, हा पर्याय सध्या सगळ्यांसाठी अडचणीचा ठरु शकतो. तिसरा पर्याय आहे तो म्हणजे मनसे. तिसरा पर्याय या बंडखोरांनी आमदारां जवळच असल्याचे देखील दोन करणे सांगितले जातात एक म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वीकारलेला हिंदुत्वाचा मुद्दा आणि त्यांच्या नावा सोबतच आलेला ठाकरे हा ब्रँड.