मुंबई:शिवसेनेचे एकनाथ शिंदें यांनी पक्षा विरोधात बंड पुकारले आणि सुरत मार्गे गुवाहाटी गाठले. त्यांना समर्थन देणाऱ्या आमदार मंत्र्यांची संख्या दररोज वाढत गेली. शेवटी शिवसेना आणि अपक्षांचे मिळुन 50 वर आमदार त्यांच्या गटात सहभागी झाले. सरकार अल्पमतात आले एकीकडे बंडखोर आमदारांना गोंजारण्याचा भावणिक प्रयत्न होत असताना त्यांच्या विराेधात टीका सोबतच आंदोलनेही झाली. महाविकास आघाडी सरकार वाचवण्याचे सगळे प्रयत्न संपल्यावर भाजपने राज्यपालांना पत्र देत सरकारने बहुमत सिध्द करावे यासाठी अधिवेशन बोलावण्याची मागणी केली त्याला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले पण त्याचा फायदा झाला नाही.
एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना:भाजने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या नंतर दुसरीकडे बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटी वरुन गोव्यात आलेले एकनाथ शिंदे गोव्यावरुन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. समर्थक आमदारांच्या सहिचे पत्र घेऊन ते निघाल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे मुंबईत आल्या नंतर देवेंद्र फडणविस आणि भाजपच्या प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील आणि बंडखोर आमदारांचे भापला समर्थन असल्याचे पत्र देतील त्यानंतर राज्यपालांकडे शपथविधी साठी वेळ मागितला जाऊ शकतो. मुंबईत आल्यावर शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन त्यांचा अशिर्वाद घेतील असेही सांगणअयात येत आहे.
अखेर उद्धव ठाकरेंचा राजीनामा: बंडामुळे अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे बहुमत सिध्द करण्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आणि रात्री राजभवन गाठुन राजीनामा सादर केला. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गटात आनंदोत्सव पहायला मिळाला. तर काॅग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने 28 नोंव्हेबर 2019 राजी सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांत पाय उतार झाले.
भाजपचा सत्ता स्थापनेचा दावा:महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी होत आहे. या बैठकीला राज्याचे प्रभारी सी. टी. रवी हेसुद्धा उपस्थित आहेत. या बैठकीनंतर सत्ता स्थापनेच्या दावा करण्यासाठी देवेंद्र फडवणीस राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. भाजपला शिवसेनेतुन फुटलेल्या बंडखोरांचे समर्थन आहे. त्या जोरावर भाजप आणि शिंदे गट बहुमताचे नवे सरकार स्थापन करणार अशी परस्थिती आता निर्माण झाली आहे.
फडणवीस होणार पुन्हा मुख्यमंक्षी :देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. नागपूर नैऋत्य विधानसभा मतदार संघाचे ते नेतृत्व करतात. 2014 च्या विधान सभा निवडणुकीत त्यांनी युतीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा जबाबदारी सांभाळली होती. 2019 च्या विधान सभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरीही युती तुटल्याने त्यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली होती. 2019 ला महाविकास आघाडी स्थापन होऊन सेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्र्याची माळ पडली. त्यामुळे मी पुन्हा येईन! अशी घोषणा देणारे फडणवीस हे मुख्यमंत्री पदापासून दूर राहिले. परंतु आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमुळे भाजप पुन्हा सत्तेत येण्याची आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
उद्या शपथविधी होण्याची शक्यता :महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळल्यानंतर, मी पुन्हा येईन असे सांगणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आता थोडा अवधी शिल्लक राहिलेला आहे. उद्या सायंकाळी शपथविधी होणार असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. 1 जुलैला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडेल. मात्र त्यांच्या सोबत अजून आठ ते दहा मंत्री पहिल्यांदा शपथ घेतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. भारतीय जनता पक्षाकडून पाच ते सहा मंत्री, तर एकनाथ शिंदेच्या गटाकडून चार ते पाच मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा:शिवसेना संपवण्याचे कोणी प्रयत्न करू नये- संजय राऊत