मुंबई:महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. शिंदेंच्या बंडात सामिल होत असलेल्या आमदारांची संख्या वाढत आहे. उध्दव ठाकरे यांनी केलेल्या भावणीक आवाहनाचा फारसा परीणाम झालेला दिसत नाही. यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा आम्ही फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत अजुनही अनेक आमदार वापस येतील आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत असा आशावाद व्यक्त केला आहे. यात राष्ट्रवादी काॅंग्रेसने आम्ही शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्या पुर्ण पाठीशी असल्याचे सांगितल्यामुळे घडामोडी कोणते वळण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार आणि उध्दव ठाकरे नवा चमत्कार करत शिंदेंचे बंड थंड करु शकतात का याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांना आवश्यक ती मदत करण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले शिवसेनेचे विधानसभेचे आमदार परत येतील, असा असा आम्हाला विश्वास आहे. आमदार आल्यावर चित्र अधिक स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्यामुळे त्यांना पूर्णपणाने या महाविकास आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी आमचा यापूर्वी पाठिंबा आहे आणि आताही त्याला पूर्ण पाठिंबा राहणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असे सुचक विधानही त्यांनी केले आहे. तर शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांना संघर्षाची तयारी ठेवा आणि कणखर भूमिका घ्या असा सल्ला दिला आहे.