महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : शरद पवार भेटीत काय बोलले? अमोल कोल्हेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायचा निर्णय केला रद्द - राष्ट्रवादीचे खासदार

राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा अभिनेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर आपल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

Maharashtra Political Crisis
संपादित छायाचित्र

By

Published : Jul 5, 2023, 7:14 AM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष सोडण्याचे ठरवले होते, मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर निर्णय बदलल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना अमोल कोल्हे उपस्थित होते. मात्र त्यानंतर अमोल कोल्हे यांनी पत्र जाहीर करत आपली निष्ठा शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते.

खासदारकी सोडण्याचा निर्णय :राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे अमोल कोल्हे यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचे स्पष्ट केले.

लोकशाहीच्या रक्षणासाठी जनादेश महत्वाचा :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडमोडींबद्दल केवळ माझ्याच मनात नाही, तर राज्यातील तरुण आणि मतदारांच्याही मनात अस्वस्थता असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी शिरूरच्या मतदारांनी तुम्हाला 5 वर्षांचा जनादेश दिला आहे. त्यात आता आठ ते दहा महिने उरले आहेत. मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन पूर्ण करणे हे तुमचे कर्तव्य असल्याचा सल्ला शरद पवार यांनी दिल्याचेही अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

जब दिल और दिमाग मे जंग हो तो दिल की सुनो :राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर एक निवेदन जारी केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आपण भेट घेतली आहे. त्यांची भेट घेतल्यानंतर आपल्याला भेडसावत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. यावेळी अमोल कोल्हे यांनी जब दिल और दिमाग मे जंग हो तो दिल की सुनो, असेही ट्विट केले आहे.

हेही वाचा -

  1. Political Crisis In NCP : १९७८ साली काकांनी केलेल्या बंडाची पुतण्याने केली पुनरावृत्ती
  2. Maharashtra Political Crisis : सवता सुभा थाटल्यावर पवार काका पुतण्यांनी बोलावली बैठक, कोण कुणाच्या गोटात ते उद्या होणार स्पष्ट

ABOUT THE AUTHOR

...view details