महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra political Crisis: विधानपरिषदेवर १२ आमदार नियुक्तीवरील स्थगिती उठविली, आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी १२ आमदार नियुक्ती

महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या भविष्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात झाला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले नव्हते.

Maharashtra political Crisis
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या भविष्याचा निर्णय

By

Published : Jul 11, 2023, 7:48 AM IST

Updated : Jul 11, 2023, 12:32 PM IST

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने विधानपरिषदेवर 12 आमदार नियुक्तीवरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सप्टेंबर 2022 पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना न्यायालयात स्थगिती दिली आहे. त्यामुळे आज ही स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. . यापूर्वी न्यायमूर्ती जोसेफ यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. मात्र ते निवृत्त झाल्यामुळे हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आली.

सर्वोच्च न्यायालयात याचिका :महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा घोळ मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. तेव्हा तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 12 सदस्यांची यादी पाठवण्यात आली होती. मात्र, या 12 सदस्यांच्या यादीला राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळाला नाही. तसेच यादी मंजूर करण्यातबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. याप्रकरणी तत्कालीन राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी यावर कोणताही निर्णय घेतला नाही.

जोरदार लॉबिंग सुरू : यानंतर 2022 मध्ये राज्यात घडलेलेल्या राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आले. या नवीन सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नवीन यादी राज्यपालांनी सादर करण्याची तयारी सुरू केली. या 12 नावांसाठी दोन्हीकडून जोरदार लॉबिंग सुरु असल्याची चर्चा आहे. आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपला 12 पैकी 8 आणि शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ता बदलानंतर या संदर्भात एक वेगळी याचिका दाखल करण्यात आलेली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन आधीची यादी परत पाठवली. न्यायालयाने हे कृत्य नियमात बसणारे नाही, असे म्हणत आक्षेप घेतला होता. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.

नरहरी झिरवळ यांचे वक्तव्य : सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरणही दाखल आहे. सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते 16 आमदार अपात्र ठरतील, असे मोठे वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नुकतेच केले आहे. अपात्रतेची निर्णय प्रक्रिया सुरू झाल्यावर नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असा निर्णय दिला आहे.

हेही वाचा :

  1. Governor Appointed 12 MLA Issue: राज्यपाल नियुक्त जागांसाठी रस्सीखेच, शिंदे गटाला ४ जागा मिळण्याती शक्यता
  2. Future of 12 MLA : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निर्णयाचा फैसला उद्या, सरकार पुन्हा मुदतवाढ मागणार का?
  3. राज्यपाल कोश्यारींनी घेतली गृहमंत्री शाहांची भेट, 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणाची किनार?
Last Updated : Jul 11, 2023, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details