मुंबई - अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर (CM Eknath Shinde Resignation) अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पण अजित पवार यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांचे (NCP Crisis) मुख्यमंत्रीपद जाणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. तसे विधानेही विरोधी पक्षातील नेत्यांकडून केले जात आहे. या सर्वांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत उत्तर दिले आहे.
राजीनाम्याबाबतच्या सर्व अफवा आहेत. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्विकारले आहे. तसेच महाराष्ट्रात विकास होत असल्याचेही त्यांनी मान्य केले - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
राजीनामाच्या अफवा -अजित पवार यांना सोबत घेऊन भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट करणार असल्याचा गौप्यस्फोट विरोधकांकडून करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकारची विधाने केली होती. त्यामुळे आता शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची धोक्यात असल्याची चर्चा सुरू होती. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी राजीनामा देणार या सर्व अफवा आहेत त्या अफवांमध्ये काहीच तथ्य नाही.