Maharashtra Political Crisis : मंत्रिमंडळाची बैठकही टाय टाय फीस - मंत्रिमंडळाची बैठकही टाय टाय फीस
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळुन निघाले आहे. कोणत्या क्षणाला काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभुमीवर आयोजित केलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सरकार बरखास्तीवर चर्चा होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना. प्रत्यक्ष बैठकीत मात्र प्रचंड निरुत्साह पहायला मिळाला. शिवसेनेचा एकमेव मंत्री बैठकीत उपस्थित होता.
मुंबई: राज्यसभा आणि विधानसभा निवडणुक त्यात रंगलेले राजकारण मतांची झालेली फाटाफुट आणि त्या पाठोपाठ शिवसेनेला खिंडार पाडत मंत्र्यांसह शिवसेनेचे 34 आमदार आणि अपक्षांना घेऊन वजनदार मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेडा फडकावला.महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळुन निघाले आहे. कोणत्या क्षणाला काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभुमीवर आयोजित केलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सरकार बरखास्तीवर चर्चा होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना. प्रत्यक्ष बैठकीत मात्र प्रचंड निरुत्साह पहायला मिळाला. शिवसेनेचा एकमेव मंत्री बैठकीत उपस्थित होता. उदय सामंत, दादा भुसे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिले.