महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : अजित पवारांसोबत मुख्यमंत्रीपदासाठी डील? विरोधकांची उघड चर्चा - मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांना शब्द

अजित पवार यांनी (NCP Political Crisis) भाजपच्या साथीने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील 9 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप (Maharashtra CM post to Ajit Pawar) झाला. मात्र, अजित पवार यांनी उचललेल्या पावलांबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिल्याचीही चर्चा सुरू आहे.

maharashtra political crisis
अजित पवार

By

Published : Jul 3, 2023, 7:45 PM IST

मुंबई - रविवारी अजित पवार यांनी (NCP Political Crisis) राष्ट्रवादीला धक्का देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. अजित पवार यांना सत्तेत घेणे हा भाजपचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उभा केलेला (Maharashtra CM post to Ajit Pawar) डाव असल्याची चर्चा विरोधकांमध्ये सुरू आहे. तसे काही विधाने विरोधकांनी देखील केली आहेत.

अजित पवारांना मुख्यमंत्रीपद? :अजित पवार यांची डील ही मुख्यमंत्रीपदासाठी झाली असल्याचा दावा अनेक मोठ्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या काळात राज्याच्या राजकारणात आणखी काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार हे निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या घटनाक्रमामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद कमी होईल. आता एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी अजित पवार यांना आधीच बहुमत असलेल्या सरकारमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे - जयंत पाटील, नेते, राष्ट्रवादी

सत्तेत सहभागी करुन अजित पवार यांना भाजपने मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला आहे अशी माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात काय घडामोडी घडतात यावर तो शब्द स्पष्ट होईल - पृथ्वीराज चव्हाण, नेते, काँग्रेस

एकनाथ शिंदेसह 16 आमदार लवकरच अपात्र होणार आहेत, त्यामुळेच राजकारणात ट्विस्ट आला आहे. त्यानंतर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. भाजप आणि अजित पवारांमध्ये सीएम पदासाठीच करार झाला असून सध्याचे मुख्यमंत्री लवकरच घरी जातील - संजय राऊत, खासदार, ठाकरे गट

शिंदे अडचणीत? -अजित पवार यांना सत्तेत सहभागी करुन त्यांना उपमुख्यमंत्रीपदही देण्यात आले आहे. पवारांना सत्तेत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे अजित पवार यांना सोबत घेणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी फायदेशीर आहे की नाही हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा -

  1. NCP Political Crisis : शरद पवारांसोबत राष्ट्रवादीची यंगब्रिगेड; ज्येष्ठांची फळी मात्र....
  2. Maharshtra Political Crisis : अजित पवारांच्या ४० वर्षांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही - अमोल मिटकरी
  3. Maharashtra Political Crisis : साहेबांकडे जावे की दादांकडे; आमदारांची झाली गोची, पाहा आकडेवारी

ABOUT THE AUTHOR

...view details