महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : अजित पवारांच्या बंडामुळे भाजपला फायदा

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून ( Maharashtra Political Crisis ) अजित पवार हे शिवसेना-भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले आहे. (Ajit Pawar Rebel ) एकंदरीतच, शिवसेना असो वा राष्ट्रवादी पक्ष फुटीचा फायदा निश्चितच (BJP advantage) लोकसभा निवडणुकीत भाजपला होणार असल्याचे बोलले जात आहे.

Ajit Pawar Rebellions
अजित पवार

By

Published : Jul 2, 2023, 7:52 PM IST

मुंबई : भाजपने 2014 साली तात्कालीन काँग्रेस सरकारच्या (Rebellion in NCP) विरोधात रणनिती आखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सत्ता स्थापन केली. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक राज्यांच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला अनेक ठिकाणी यश मिळाले आहे. (Ajit Pawar rebellion) 2016 साली भाजपने 2019 पासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. (BJP advantage) त्या अनुषंगाने भाजपकडून विरोधी पक्षाला धोबीपछाड देण्याच्या उद्देशाने काँग्रेससोबत असलेल्या सहयोगी पक्षांना दूर सारून आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश येत होते. एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपने 'ऑपरेशन लोटस' राबवल्याने त्याचा फायदा भाजपला झाला.

अजित पवार म्हणतात, आम्हीच खरे राकॉं:राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह आमचेच म्हणत सरकारमधील शिवसेना-भाजप सोबत आम्हीच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर देखील चर्चा रंगू लागली आहे.

विरोधी पक्ष कमकुवत करणे:2014 पासून केंद्रातील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष काम करत आहे. काँग्रेसला एकाकी केले तरच आपण सत्तेत कायम राहू शकतो, हे भाजपला माहीत आहे. त्यामुळे देशात काँग्रेस बळ वाढता कामा नये, यासाठी काँग्रेस सोबत असलेल्या सहयोगी प्रादेशिक घटक पक्षांना फोडले तरच हे शक्य होऊ शकते. प्रादेशिक पक्षात फूट पाडून अनेक ठिकाणी भाजपने सत्ता स्थापन केली. वारंवार विरोधी पक्षाने देखील यावर मत व्यक्त केले आहे.


महाविकास आघाडीला सुरुंग:महाविकास आघाडीतील शिवसेनेत उभी फूट पडली. ठाकरे गट (शिवसेना) कमकुवत झाला. तशाच प्रकारे राष्ट्रवादीत देखील बंडखोरी झाल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष एकाकी पडणार आहे. त्यामुळे नकळत सर्व गोष्टींचा फायदा भाजपला होणार असल्याचे बोलले जात आहे.

सत्ता स्थापनेचा आधुनिक ट्रेंड:भविष्यातील राजकारणाचा विचार केला तर सत्ताधाऱ्यांनी आपल्या विरोधातील विरोधी पक्षांचे खच्चीकरण केले. सत्ता आपल्याकडे ठेवून विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवणे हा नवीन ट्रेंड भविष्यात पाहायला मिळू शकतो. लोकशाही असलेल्या महाराष्ट्र राज्यात जनता हे खपवून घेणार का, हे येणारा काळच ठरवेल.

ABOUT THE AUTHOR

...view details