मुंबई:राष्ट्रवादीत उभी फूट पडली असताना प्रथमच आज बैठक होत आहे. सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री यांनी एमई कॉलेजलमध्ये बैठक बोलाविली आहे. तर शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बैठक बोलाविली आहे. दोन्ही बैठकांमध्ये आज समर्थक आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत, हे समजणार आहे. शरद पवार यांच्याकडून विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप बजावला आहे. तर अजित पवार यांच्याकडून नवीन नेमलेले प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप बजाविला आहे.
Live Updates
भारतीय निवडणूक आयोगाला अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा करणारी याचिका प्राप्त झाली आहे. तसेच जयंत पाटील यांच्याकडूनही 9 आमदारांविरुद्ध अपात्रतेची प्रक्रिया सुरू करावी याबाबतची याचिका निवडणूक आयोगाला प्राप्त झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पवार साहेबांच्या छत्रछायेखाली तयार झालो. ही वेळ आपल्याव का आली? शरद पवार आपले श्रद्धास्थान आहे. १९७८ पासून साहेबांना राज्याने साथ दिली. लोकांच्या विकासासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. १९७० च्या वेळी जनसंघ कुठे आहे? तेव्हा देशाला करिष्मा असणारा नेता नव्हता.
पहाटेचा शपथविधी म्हणजे पक्षाच्या नियमानुसार काम केले. शरद पवारांनी आमची भावना समजावी. आम्ही हात जोडून विनंती करतो. तुम्ही आम्हाला आशिर्वाद द्या. पटेल म्हणजे पवारांची सावली आहे, असे प्रफुरल पटेल यांनी अजित पवारांच्या बैठकीत म्हटले आहे. एनडीएसोबत गेलो तर वैचारिक मतभेद कसले? शिवसेनेचे विचार स्वीकरता मग भाजपचे विचार का स्वीकारत नाही.. पवारांवर सर्वाधिक टीका शिवसेनेने केली. मी जर पुस्तक लिहिले तर असा त्यांनी गर्भित इशारा दिला आहे. दादांनी स्वत:साठी कधी निर्णय घेतला नाही, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे.
वसंतदादा यांना असेच वाईट वाटले-भुजबळ गुगलीने आपल्याच गड्याला आउट करायचे का असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.जसे शिवसेनेबरोबर गेलो, तसे भाजपबरोबर गेले आहोत. पक्षात सगळ्याच समाजाकडे लक्ष दिलेले नाहीत.भाजपमध्ये आम्ही प्रवेश केलेला नाही. आम्ही हरणार नाही लढणार आहोत. तुरुंगात गेलो, पण लढा सोडला नाही. साहेबांना वाईट वाटले स्वाभाविक आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू येणे स्वाभाविक आहे. विठ्ठलाला बडव्यांना घेरले आहे, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. कार्यकर्त्यांना वाईट वागणूक मिळाली आहे. नागालँडमध्ये आमदार हे भाजपमध्ये गेले. त्यांच्याप्रमाणे आमचा सत्कार नाही का? वसंतदादा यांना असेच वाईट वाटले, अशी आठवण भुजबळ यांनी करून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एमईटी वांद्रे येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रती निष्ठा दर्शवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांकडून शपथपत्रे घेतली आहेत. 57 वर्षे राजकारणात असून विचार करून निर्णय घेतला आहे. येथे ८ हजारांहून अधिक लोक हजर आहेत. कार्यकर्त्यांचा गेल्या काही महिन्यांपासून आग्रह होता. त्यामुळे निर्णय घेतल्याचे दुसरीकडे वायबी सेंटरमध्ये आणखी नेते दाखल होणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
अजित पवारांच्या बैठकीला २४ आमदार पोहोचले आहे. धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप मोहिते, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, आमदार सुनील शेळके, दिलीप वळसे पाटील, निलेश लंके, हसन मुश्रीफ आदी आमदारांचा समावेश आहे. शरद पवार यांच्या बाजूने असल्याचा दावा करणारे आमदार दिलीप मोहिते देखील अजित पवारांच्या बैठकीला हजर आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी वाय. बी. सेंटरच्या दिशेने कूच केले. यावेळी कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मूळ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीसजितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट आदी भागातून सुमारे ९१ बसगाड्यांमधून हजारो महिला- पुरूष कार्यकर्ते रवाना झाले.
अजित पवार हे एमईटी सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर थेट व्यासपीठावर पोहोचले आहेत. दादा समर्थकांनी एकच गर्दी केली आहे. दुसरीकडे शरद पवार यांची बैठक वायबी सेंटरमध्ये असून केवळ 6 आमदार आणि एक विधानपरिषद आमदार पोहोचला आहे. अजित पवारांच्या बैठकीला २३ आमदार पोहोचले आहेत. अजित पवार वांद्र्यातील एमईटीकडे रवाना झाले आहेत. अजित पवारांच्या समर्थकांनी एमईटीबाहेर गर्दी केली आहे. राज्यभरातून दोन्ही गटाचे समर्थक मुंबईत पोहोचले आहेत. थोड्याच वेळात अजित पवार यांची एमईटी येथे बैठक होणार आहे. या बैठकीत किती आमदार आले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले, की लोकसभा किंवा राज्याच्या निवडणुकीच्या ५-६ महिने आधी ईव्हीएम मशीन तपासण्यात येतात. ४ दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीनचे उत्पादन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे डिसेंबर 2023 मध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असा अंदाज आमदार पवार यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीत उभी फुट असताना शरद पवारांच्या गटाने सावध भूमिका घेतली आहे. शरद पवार यांच्या बाजूनं राहणाऱ्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. शरद पवार गट प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकांऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेणार आहे. शरद पवार विरूद्ध अजित पवार संघर्ष अजून टोकाला जाण्याची शक्यता बळावली आहे.
शिंदे गटाची नाराजी उघड शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते व प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सामील झाल्यानंतर आमच्या गटातील लोक नाराज झाले आहेत. कारण काही आमच्या नेत्यांना हवे ते स्थान मिळणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने सगळेच नेते खूस नाहीत. ही भावनाआम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळविली आहे. त्यांना हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. आम्ही पूर्वीप्रमाणेच आजही राष्ट्रवादीच्या व शरद पवारांच्या विरोधात आहोत. उद्धव मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस सरकार चालवत होते. आता एकनाथ शिंदे प्रत्यक्ष कृती घेणार आहेत.
ठाण्यात अजित पवार यांचे कार्यालय होणार सुरू-ठाण्यात अजित पवार गटाकडून लवकरच नवीन कार्यालयाचा शुभारंभ होणार आहे. स्वतः अजित पवार कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाण्यात येणार असल्याची राजकीय सूत्रांनी माहिती दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. अजित गटाचे नवीन कार्यालय ठाण्याच्या मध्यवर्ती भागातच उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. अजित पावर उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे पेढे वाटप करत अजित पवार यांच्या समर्थकांनी काल जिंतेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारले. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्ष कोणाचा ? या दाव्यासाठी राष्ट्रवादी पक्षा मध्ये उभी फूट पाहायला मिळणार?
आमदारांची देवगिरी येथे गर्दी-एमईटी वांद्रे येथे अजित पवारांच्या समर्थकांनी बॅनरमध्ये शरद पवारांचा फोटो वापरला आहे. विशष म्हणजे शरद पवार यांनी अजित पवार गटाला फोटो वापरण्यास परवानगी नाकारली आहे. बैठकीआधी अनेक आमदार अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर दाखल झाले आहेत. दिलीप वळसे पाटील, अमोल मिटकरी, संजय बनसोडे हे देवगिरीवर दाखल झाले आहेत. अजित पवार हे निवडणूक आयोगात पक्ष व चिन्ह यांचा दावा करण्याची शक्यता आहे.
दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार-बारामतीत शरद पवारांना पाठिंबा देणारे फलक लागले आहेत. पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्याबाहेरही बॅनर लागले आहेत. अजित पवारांना पाठिंबा देणारे फलक त्यांच्या निवासस्थााबाहेर लागले आहेत. त्यांचा फोटो बॅनरमधून गायब आहे. शरद पवार यांनी परवानगीशिवाय फोटो लावण्यास मनाई केली आहे. त्यामुळे हा बदल झाल्याचे दिसत आहे. शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थक विविध जिल्ह्यामधून मुंबईला निघाले आहेत.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी सर्व आमदारांना व्हीप जारी करून आजच्या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटानेही पक्षाच्या आमदारांची स्वतंत्र बैठक बोलावली. विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीपमध्ये म्हटले, की ५ जुलैला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी १ वाजता बैठक बोलाविली आहे. या बैठकीला सर्व आमदारांची उपस्थिती अनिवार्य आहे.
फोटो परवानगीशिवाय वापरण्यास मनाई -राष्ट्रवादीतील बंडाळी पाहता यशवंतराव चव्हाण सभागृहातील बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांवर पक्षाकडून कठोर कारवाई होऊ शकते. अजित पवार हे आठ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना कठोर पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार आठ आमदारांसह शिवसेना-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांचा फोटो परवानगीशिवाय वापरण्यास मनाई केली आहे.
दोन्ही गटात हकालपट्टी व नियुक्तींचे निर्णय-आज सकाळी वांद्रे येथील एमईटी संस्थेच्या आवारात अजित पवार गटाची बैठक होणार आहे. अजित पवार यांच्या गटाची नोटीस राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे यांनी काढली आहे. राष्ट्रवादीने पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग केल्याने गर्जे यांची राष्ट्रवादीने हकालपट्टी केली आहे. अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना आमदार म्हणून अपात्र करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे.
40 हून अधिक आमदार असल्याचा पटेल यांचा दावा-राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजित पवार आणि इतर आठ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिफारस केली आहे. महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. यापैकी कोणते आमदार अजित पवार यांच्याकडे आहेत, हे आज स्पष्ट होणार आहे. प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार गटाकडे 40हून अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा-
- Political Crisis In NCP : १९७८ साली काकांनी केलेल्या बंडाची पुतण्याने केली पुनरावृत्ती
- Jayant Patil Taunt Ajit Pawar: आमची 'नॅशनॅलिस्ट' त्यांची 'नोशनल' पार्टी - जयंत पाटील
- Maharashtra Political Crisis : सवता सुभा थाटल्यावर पवार काका पुतण्यांनी बोलावली बैठक, कोण कुणाच्या गोटात ते उद्या होणार स्पष्ट