मुंबई:राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षावर अजित पवारांनी दावा केल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक बोलाविली आहे. आपणच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा दावा अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वी प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली होती. मात्र, अजित पवारांबरोबरील बंडात सहभागी झाल्याने त्यांना पटेलांना हटविण्यात आले आहे. पक्षाचे खजिनदार सुनील तटकरे यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याकडून आजच्या बैठकीत नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे.
Live Update
दुसऱ्याची घरे फोडणे एवढेच आयुध भाजपच्या जवळ-नाना पटोलेभाजप जनतेमध्ये संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी व गरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. काँग्रेस महाविकास आघाडीला सोबत घेऊन ताकदीने लढणार आहे. भाजपला लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. काँग्रेसबाबत चुकीची माहिती पसरविली जात आहे. दुसऱ्याची घरे फोडणे एवढेच आयुध भाजपच्या जवळ आहे. सीबीआय, ईडीची भीती दाखन फोडाफोडी करण्यात येते. भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात आहे. भाजपला जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीतील फूट खरी आहे-शरद पवार यांनी निवृत्त व्हावे, अशी अजित पवार यांनी बैठकीत जाहीरपणे इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की यावरून वर्षानुवर्षे कटुता असल्याचे दिसून येते. कदाचित पवार साहेबांच्या पक्षाच्या व्यवस्थापनात काही त्रुटी असू शकतात. आपल्या मुलीला पुढे करण्यासाठी त्यांनी काही लोकांना बाजूला केले असाव. पण या कौटुंबिक वादाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होत आहे. राष्ट्रवादीतील फूट खरी आहे. त्यामध्ये कटुता असल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या निवृत्तीबाबत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की अजित पवार यांनी म्हटल्याने शरद पवार निवृत्त होणार आहेत का? वय झाल्याने राजकारणात निवृत्ती नसते, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले.
ठाकरे गटात जाण्याचा प्रश्न येणार नाही-उदय सामंतवर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. काहीही न घडता गोष्टी पोहोचतात याचा खुलासा करणार आहे. मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत. शिंदे संयमी नेतृत्व आहेत, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आहेत. मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास असल्याचे बैठकीत ठरले. दोन पक्ष असताना तिसरा पक्ष सोबत आल्याने काहीही फरक पडणार नाही. आमदारांमध्ये बाचाबाची झाली, शिंदे मुंबईत आले, रामदास भाईंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही असं म्हटले, हे सगळे चुकीचं आहे. चुकीच्या पद्धतीने प्रतिमा डागाळणे हे चुकीचे आहे. गद्दार आणि खोके यातून आमची मुक्ती झाली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जात आहोत. काही विनाकारण उद्योग करत आहेत. जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. ठाकरे गटात जाण्याचा प्रश्न येणार नाही. सरकार आज उद्या पडेल असे सांगत होते. मात्र सरकार पडले नाही. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे सांगितले जात आहे.
- महाराष्ट्र काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत सुरू आहे. विरोधी पक्षनेते, राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
रामदास आठवले यांनी अजित पवारांची घेतली भेट- रामदास आठवले म्हणाले, की अजित पवारांनी योग्य निर्णय घेतला आहे. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षांपासून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना सोबत घेऊन चालले आहेत. हिंदू, मुस्लीम, दलित अशा सर्वांचा पंतप्रधान मोदींना सर्वांचा पाठिंबा आहे. अजित पवार यांनी मला सांगितले की, त्यांच्या मनात हा विचार बराच काळापासून होता.
- अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने मनसेमध्येही नाराजीचे चित्र आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली आहे. ही भेट ठाकरे गट व मनसेच्या युतीबाबत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. पानसे यांनी राऊत यांची सदिच्छा भेट घेतली आहे. असे असले तरी राज्यात पुणे, मुंबई, बीड अशा विविध जिल्ह्यांमध्ये ठाकरे बंधुंनी पुन्हा एकत्र यावे, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेच अधिकृत भूमिका आगामी सभेत स्पष्ट करणार आहेत.
- राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर शरद पवार हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते बैठकीतील निर्णयाची माहिती देणार आहेत. तसेच पक्षावर पकड टिकविण्यासाठी काय करणार याविषयी बोलण्याची शक्यता आहे.
- अजित पवारांची काही विधाने गंभीर आहेत. निवडणुका लागेपर्यंत जागा वाटपावर चर्चा नाही. अजित पवारांवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी सत्य स्थिती मांडली. शरद पवारांचा राजकीय आलेख बाहेर काढला आहे. अजित पवारांची भूमिका महाराष्ट्र हिताची आहे.
- रामदास आठवले यांनी अजित पवारांची घेतली भेट- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले. रामदास आठवले हे आजवर सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करत असल्याचे दिसून आले आहेत. मात्र, अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने राजकीय चित्र बदलले आहे.
सरकारमध्ये जाण्याआधी अभ्यास केला. कायदेतज्ज्ञांतचा सल्ला घेऊन पूर्ण विचाराने निर्णय घेतला आहे. आम्हाला अपात्र होण्याची भीती नाही. विश्वास बसल्यावरच पाऊले उचलली आहेत. कागदपत्रे सह्या करून निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहेत. त्यावर अजित पवारांचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून नाव आहे. आमच्या आमदारांना गोवा, सुरत व गुवाहाटी नाही. वर्षभरापूर्वीची स्थिती वेगळी होती. अजित पवारच पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.