मुंबई:शिवसेनेतून गेलेल्या बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. तसेच ज्यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत बारा ते सोळा लोक आले होते. जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा एक सोडून इतर सर्वांचा पराभव झाला. हा पूर्वीचा अनुभव आहे, असे म्हणत शरद पवारांनी (sharad Pawar) एकनाथ शिंदेसोबत (Eknath Shinde) गेलेल्या आमदारांना सुचक इशारा दिला होता.
पवारांच्या या वक्तव्या नंतर त्याला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधानसभेतील बंडखोर आमदारांचे कोणतेही नुकसान झाले तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे म्हणले आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले होते यात 'माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.असे म्हणले होते.