महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News : दहिसर पूर्व डीएन दुबे रोडवरील दुकानांना भीषण आग

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Dec 9, 2022, 6:36 AM IST

Updated : Dec 9, 2022, 9:28 PM IST

21:26 December 09

दहिसर पूर्व डीएन दुबे रोडवरील दुकानांना भीषण आग

मुंबईतील दहिसर पूर्व डीएन दुबे रोडवरील दोन तीन दुकानांना भीषण आग लागली

दहिसर पूर्व डीएन दुबे रॉड येथील तीन दुकानांना आज सायंकाळी 7.30 च्या सुमारास आग लागली. लोकांनी दहिसर पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली.

एक गादी बनवणारे, हार्डवेअरचे दुकान आणि एक घर आगीच्या भक्ष्यस्थानी आले. आग विझवण्यात यश आले आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

20:36 December 09

आधारकार्डवर गुजराती भाषेत `मारो आधार मारो पहचान'; नागरिकांचा संताप

ठाणे :डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकाला चक्क गुजराती भाषेतून स्मार्ट कार्ड आल्याने त्यांनी अशा चुकीबद्दल आता कोणाला जाब विचारणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. हे आधारकार्ड `मारो आधार मारो पहचान` गुजराती भाषेतून बनवून आले असल्याने आता आम्ही काय गुजरातला राहायला जायचे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबई गुजरात राज्याला जोडण्याचे प्रयत्न यातून सुरु असल्याचे हे उदाहरण असल्याचा आरोप शिवसैनिक गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे यांनी यावेळी केला.

19:48 December 09

सिन्नरला कार पलटी होऊन 4 विद्यार्थी ठार

नाशिक : नाशिक सिन्नर महामार्गावरील महोदरी घाटामध्ये कारला अपघात होऊन यात 4 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कारचे टायर फुटल्याने कार डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनवर जाऊन एका वाहनाला धडक दिल्याने दुसऱ्या वाहनातील प्रवासी देखील जखमी झाले आहेत. हे चारही महाविद्यालयीन विद्यार्थी लग्नावरून परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाला.

19:44 December 09

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून रिक्षाचालकाला बेदम मारहाण

ठाणे : पोलिसाचा खबरी असल्याच्या संशयातून रिक्षाचालकाला कारमधून घेऊन जाऊन एका घरात कोंडले. तसेच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कोनगावातील म्हात्रे कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात बेदम मारहाण करणाऱ्या अमलीपदार्थ तस्करासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद हुसेन मुनावर शेख उर्फ अण्णा असे गुन्हा दाखल झालेल्या अमलीपदार्थ तस्कराचे नाव आहे.

18:46 December 09

बेस्टचा प्रिमियम बस सेवा सुरू करण्याचा निर्णय

मुंबई - बेस्टकडून आपल्या प्रवाशांना नेहमीच नवीन सुविधा दिल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून प्रिमियम बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान ही बस सेवा सोमवार १२ डिसेंबर पासून चालवली जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

18:10 December 09

बेळगाव जिल्ह्यातील परिस्थिती शांततापूर्ण

गेल्या काही दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यातील परिस्थिती शांततापूर्ण आणि सामान्य आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये 200 हून अधिक बसेस धावू लागल्या आहेत. बेळगावचे उपायुक्त नितेश पाटील यांनी ही माहिती दिली.

17:30 December 09

मराठी पाट्यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने केली स्थगित, फेडरेशनला फटकारले

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनच्या महाराष्ट्र सरकारविरोधातील विशेष परवानगी याचिकेवरील सुनावणीला स्थगिती दिली. यावेळी कोर्टाने मराठी भाषेच्या वापराला विरोध का, असा असा सवाल फेडरेशनला विचारला. न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. फेडरेशनने महाराष्ट्र दुकान आणि प्रतिष्ठान कायद्यातील नियम ३५ च्या वैधतेला आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच कायद्यातील नियम ३५ ला वैध ठरवले आहे. उच्च न्यायालयाच्या याच निर्णयाविरोधात असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

17:22 December 09

फवाद खानचा द लीजेंड ऑफ मौला जट भारतात रिलीज होऊ नये - मनसे

फवाद खानचा 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात रिलीज होऊ नये, अशी धमकी मनसे नेत्याने दिली आहे.

16:44 December 09

लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याबाबत अद्याप निर्णय नाही - देवेंद्र फडणवीस

मुंबई - आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु या संदर्भात विविध राज्यांनी केलेल्या कायद्यांचा अभ्यास करू, असे 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा करण्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

16:33 December 09

इस्रोची हायपरसॉनिक वाहनाची चाचणी यशस्वी

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात ISROच्या इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफने संयुक्तपणे हायपरसॉनिक वाहनाच्या चाचण्या घेतल्या आहेत. चाचण्यांनी सर्व आवश्यक मापदंड साध्य केले. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

16:12 December 09

हिमाचल प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्याचा काँग्रेसचा दावा

शिमला - हिमाचल प्रदेशचे प्रभारी राजीव शुक्ला यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट. सरकार स्थापन करण्याचा दावा त्यांनी केला.

16:06 December 09

मुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा

मुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा. पोलिसांचा तपास सुरू.

15:45 December 09

MPSC मध्ये तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास राज्य सरकारची तयारी

मुंबई - गृह विभागातील सरसकट सर्व नोकर भरतीत तूर्तास तृतीय पंथीयांना संधी नाहीच. मात्र MPSC मध्ये तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास राज्य सरकारची तयारी. अडीच महिन्यांत तृतीयपंथीयांच्या शारीरिक चाचणीसाठी स्वतंत्र नियमावली बनवा हायकोर्ट. तृतीय पंथीयांची शारीरिक चाचणी 28 फेब्रुवारीनंतर नव्या नियमावलीनुसार घेण्याचे निर्देश. 15 डिसेंबरपर्यंत एमपीएससीत अर्ज करण्याची मुदत वाढवली. 13 डिसेंबरपर्यंत वेबसाईटवर तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करणार. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांची माहिती.

15:41 December 09

मंदौस वादळामुळे किनारपट्टीवर पाऊस, कोडाईकनालच्या परिसरात झाडे उन्मळून पडली

चेन्नई - तामिळनाडूत CycloneMandous मंदौस वादळामुळे किनार्‍याजवळ पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला आहे. परिणामी कोडाईकनालच्या विविध भागात झाडे उन्मळून पडली आहेत. या वादळाचा फटका पूर्वेकडील किनारपट्टीच्या राज्यांना कमी अधिक प्रमाणात बसत आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊसही पडत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत.

15:27 December 09

YSRTP प्रमुख वायएस शर्मिला पोलिसांच्या ताब्यात

हैदराबाद - तेलंगणा YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वारंगळ पोलिसांनी पदयात्रेला परवानगी नाकारल्यानंतर त्या आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करत होत्या.

14:42 December 09

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात - जयंत पाटील

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात. त्यामुळे ते कोणताच बाणेदारपणा दाखवत नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

14:32 December 09

मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही - राज्यपाल कोश्यारी

पुणे : वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असे वक्तव्य पुण्यात एका कार्यक्रमात महिलेला उत्तर देताना केल्याने राज्यपाल कोश्यारी चर्चेत आले आहेत. डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) तर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

14:03 December 09

डेटिंग app वर लक्ष ठेवले पाहिजे - सीमा कुशवाह

श्रद्धा खून प्रकरणी लोकांना डेटिंग app वापरण्याचा अधिकार असला तरी या डेटिंग app वर लक्ष ठेवले पाहिजे, असे वकील सीमा कुशवाह यांनी म्हटले आहे. हे वापरणाऱ्यांमध्ये गुन्हेगार आणि दहशतवादी असू शकतात. मला वाटते आरोपपत्रात आफताबच्या कुटुंबातील सदस्यांची नावे असावीत, असेही सीमा कुशवाह म्हणाल्या.

13:15 December 09

आम्हाला न्याय मिळेल, असे आश्वासन दिल्ली पोलिसांनी दिले - विकास वालकर

मुंबई - आम्हाला न्याय मिळेल, असे आश्वासन दिल्ली पोलिसांनी दिले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हाला तसे आश्वासन दिले, असे श्रद्धा वालकरचे विकास वडिलांनी सांगितले.

12:43 December 09

सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत आंदोलन

रत्नागिरी - शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे.

12:17 December 09

नम्मा कर्नाटक सेने संघटनेचे बेंगळुरूमधील महाराष्ट्र बँकेबाहेर महाराष्ट्राविरोधात आंदोलन

बेंगळुरू -नम्मा कर्नाटक सेने या कन्नड समर्थक संघटनेने बेंगळुरूमधील गांधीनगर येथे महाराष्ट्र बँकेच्या बाहेर महाराष्ट्राविरोधात आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

12:03 December 09

श्रद्धा वाळकरचे वडील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

मुंबई - दिल्लीमधील हत्याकांडातील श्रद्धा वाळकरचे वडील विकास वाळकर, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यावर पोहचले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हेसुद्धा त्यांच्याबरोबर आहेत.

11:53 December 09

आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

नवी दिल्ली - श्रद्धा खून प्रकरणात दिल्लीतील साकेत न्यायालयाने आरोपी आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची सुनावणी झाली. दिल्ली पोलिसांनी न्यायालयीन कोठडी वाढवण्याची मागणी केली आणि तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ही वाढ करण्यात आली.

11:30 December 09

महाविकास आघाडीच्या खासदारांची अमित शाह यांच्याबरोबर बैठक सुरू

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदारांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न आणि महाराष्ट्राशी संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींवर भेट घेतली. ही बैठक अजूनही सुरू आहे.

11:13 December 09

संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात दाखल

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणाच्या सुनावणीसाठी मुंबईतील सत्र न्यायालयात दाखल झाले.

10:41 December 09

छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी पंतप्रधान मोदींची भेट घेतली- खासदार उदयनराजे भोसले

छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी मोदींची भेट घेतली आहे. कोश्यारींविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

10:27 December 09

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

10:10 December 09

आसाम पोलिसांनी 7 कोटी रुपयांचे हेरॉईन केले जप्त

आसाम पोलिसांनी गुरुवारी रात्री कार्बी आंगलाँग जिल्ह्यात 7 कोटी रुपयांचे हेरॉईन असलेले 30,000 याबा गोळ्या आणि 55 साबण जप्त केले. तीन ड्रग्स तस्करांना अटक करण्यात आली आहे.

09:58 December 09

आरोपी आफताबला दिल्लीच्या साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात येणार

आरोपी आफताबला दिल्लीच्या साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात येणार आहे. मागील वेळी आफताबवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

09:58 December 09

नाशिक वन विभागाकडून प्राणी व पक्ष्यांचे होते पुनर्वसन

नाशिक वन विभाग, प्राणी कल्याण संघटनांसह, जखमी/आजारी पक्षी-प्राण्यांची सुटका आणि उपचार करतात आणि नंतर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडतात. इको इको फाउंडेशनचे विभव भोगले म्हणतात, "सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी आणि प्राण्यांना वाचवले जाते, उपचार केले जातात, पुनर्वसन केले जाते आणि नंतर सोडले जाते"

09:25 December 09

महाज्योती,सारथीप्रमाणे बार्टीने फेलोशिप द्यावी यासाठी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण

पुणे: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास संशोधन केंद्राच्या वतीने दिल्या जाणाऱ्या फेलोशिप या 200 विद्यार्थ्यांसाठी जाहिराती देण्यात आली असून त्यासाठी मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तारीख ही देण्यात आली आहे.परंतु बार्टीच्या धरतीवर सारथी आणि महाज्योती जर सर्वच विद्यार्थ्यांना fellowship देत असेल तर, आम्हाला सरसकट फेलोशिप द्यावी प मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्राच्या समोर महाराष्ट्रातील 902 विद्यार्थी हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत.

07:45 December 09

सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत एकाच घरातील चार जणांचा मृत्यू

जोधपूरच्या भुंगरा गावात सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या घराला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. ही माहिती जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी दिली आहे.

07:44 December 09

पुढील तीन तासांत तामिळनाडूच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

पुढील तीन तासांत तिरुवल्लूर, चेन्नई, चेंगलपट्टू आणि कांचीपुरम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज चेन्नई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला आहे.

07:15 December 09

ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम यांनी इंग्ल्ंडच्या राजाची घेतली भेट

ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी बकिंघम पॅलेस येथे राजाची भेट घेतलती. त्यांना प्रमाणपत्र सादर केले. त्यानंतर त्यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त विन डी'होन्युअरचे आयोजन केले

07:12 December 09

काही देश दहशतवाद आणि अंमली पदार्थांचा वापर राज्य धोरण करतात, मनोज सिन्हांची पाकिस्तावर अप्रत्यक्ष टीका

काही देश दहशतवाद आणि अंमली पदार्थांचा वापर राज्य धोरण म्हणून करत आहेत. त्यांना वेगळे ठेवावे लागेल. जगात कुठेही चांगला आणि वाईट दहशतवाद असू शकत नाही. दहशतवाद हा मानवजातीचा सर्वात मोठा शत्रू आहे. ते संपवण्याची वेळ आली असल्याचे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटले. ते जम्मूमधील परिषदेत बोलत होते.

06:26 December 09

Breaking News : आम्हाला न्याय मिळेल, असे आश्वासन दिल्ली पोलिसांनी दिले-विकास वालकर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा गुरुवारी युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी निकाल राखून ठेवला आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी कथित वसुली गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळणार की कारागृहातील मुक्काम वाढणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Dec 9, 2022, 9:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details