महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

265 Police lost lives : राज्यात कोविड मुळे 265 पोलीसांचा मृत्यू - Corona Update

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे (increasing number of corona patients) चिंता वाढत आहे. या काळातही नागरिकांच्या सेवेत राहणाऱ्या पोलीसांनाही कोरोनाची बाधा होत आहे. राज्यात कोविड मुळे आत्ता पर्यंत 265 पोलीसांना जीव गमवावा लागला आहे. यात सर्वाधिक 126 मृत्यू मुंबई पोलीसांचे आहेत.

Maharashtra Police
महाराष्ट्र पोलिसा

By

Published : Jan 13, 2022, 8:39 AM IST

मुंबई :महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) दिलेल्या माहिती नुसार कोविड मुळे आतापर्यंत त्यांच्या 265 कर्मचार्‍यांना आपला जीव गमवावा लागला आहे, ज्यात मुंबई पोलिसांमध्ये (Mumbai Police) सर्वाधिक 126 मृत्यू झाले आहेत. राज्यात सध्या 2,145 सक्रिय पोलिस कोविडचे रुग्ण आहेत.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढतच आहे. कोरोनाकाळातही नागरिकांच्या सेवेत राहणाऱ्या पोलिस दलातही कोरोनाचा शिरकाव झालाआहे. मुंबई पोलीस दलातील 13 DCP, 4 अतिरिक्त CP आणि एक जॉइंट CP (L&O) यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. मुंबई पोलीस दलात 523 पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना योद्धयांची भूमिका बजावणारे नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ लागली ( Navi Mumbai Police Covid Infected ) आहे. कोरोना झालेले अनेक पोलीस होम क्वॉरंटाईन राहून उपचार घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details