महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांची मॅरेथॉन : मुंबईत 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन'चे आयोजन

मुंबईमध्ये 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 42 किलोमीटरच्या आंतराष्ट्रीय मॅरेथॉनसह 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Police Marathon
पोलिसांची मॅरेथॉन

By

Published : Feb 9, 2020, 9:49 AM IST

मुंबई- देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस खात्याकडून 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तब्बल 17 हजार स्पर्धकांनी भाग घेतला असून यात महाराष्ट्र पोलीस खात्यातील 5 हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

पोलिसांची मॅरेथॉन

मुंबईतील कुलाबा येथील गेट वे ऑफ इंडिया पासून ते वरळी सी लिंक येथून पुन्हा गेट वे ऑफ इंडिया अशा 42 किलोमीटरच्या आंतराष्ट्रीय मॅरेथॉनसह 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

एरवी सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या सर्व धावपटूंसाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांची फौज तयार आहे. मॅरेथॉनच्या मार्गावर असलेले प्रत्येक रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details